छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस शहराच्या दौऱ्यावर आहेत. येथे बोलताना त्यांनी भाजपवर टीका करतानाच इतर पक्ष आणि महाविकास आघाडीला पण सुचित करताना सांगितले की, देशातील सर्वसामान्य व्यक्तीवर मला सर्वात जास्त विश्वास आहे. राजकारणी चुकला की ते त्याला जागा दाखवतात. इंदिरा गांधी सारख्या जबरदस्त नेत्यांचा पराभव जनतेने केला. एमजीएम येथे आयोजित सौधार्थ सोहळ्यात ते बोलत होते.
ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यावेळी जबाबदारी पाळली नाही म्हणून मोरारजी देसाई यांची सत्ता गेली. लोक शहाणपणाचे निर्णय घेतात. केरळ मधे भाजपचे सरकार आहे का, तामिळनाडू, कर्नाटक मधे पण त्यांचे सरकार नाही. अलीकडच्या काळात मात्र कधीही पहिल्या नाही त्या अनेक गोष्टी पहिला मिळाल्या. एवढे केले तरी नुकताच कर्नाटकात भाजपचा पराभव झाला. त्याच्या हातातून अनेक ठिकाणी सत्ता गेली.
आधिच्या सरकारांमधेही मतभेद असायचे पण सुसंवादही असायचा. बाबरी मस्जिद बाबत निर्णय होत असताना. दोन समिती तयार करण्यात आल्या त्यात संघर्ष निर्माण झाला होता. त्यावेळी मला आणि भैरवसिंग शेखावत यांना बोलावले. त्यावेळी आमच्यात चांगला संवाद होता. मत जाणून घेण्याची जबाबदारी मला दिलीं. आमच्या बैठका झाल्या. बाबरी मस्जिद अँक्शन कमिटी सोबत घेऊन सामंजस्याने प्रश्न सोडवण्यात मदत झाली.
प्रश्न सुटणार अस वाटत असताना शेखावत यांचे सरकार गेले. संवाद असला तर मोठे प्रश्न सोडवणे शक्य झाले असतें. सध्या संवादाचा अभाव आहे. मोठ्या नेत्यांचा संसदेत फारसा वावर नसतो. प्रमुखांचे दर्शन झाले तर बरे वाटते. संसदेच्या नवीन वस्तूची गरज काय हा प्रश्न होता. संभगृहाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. पण निर्णय झाला त्यात संवाद नव्हता. पक्षाच्या नेत्यांशी सुसंवाद झाला नाही. आम्हाला निर्णय माहीत नव्हता…
राष्ट्रपती सोडा उपराष्ट्रपती देखील कार्यक्रमाला दिसले नाहीत, ते सभागृहाचे प्रमुख आहेत. प्रश्न विचारले पण उत्तर मिळाले नाही. उद्घटनात त्यांना महत्त्व मिळाले असते तर पंतप्रधानांना कमी महत्त्व मिळाले असते. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला. संसदेचे महत्त्व आम्ही ठेवले नाही तर सर्व सामान्यांना आस्था कशी राहील, संसदेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे कळत आणि ते चांगले नाही.
मणिपूर बघा विशिष्ठ समाजावर हल्ले केले जातात. परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे लोकांनी निर्णय घेतलेला दिसतोय. आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे. विरोधी पक्ष एकत्र येऊन विश्वास दर्शक निर्णय दिले तर लोक पर्याय बदलतील मात्र आम्ही चुकलो तर वेगळा निर्णय जनता घेऊ शकते. राज्याच्या धोरणात्मक निर्णय स्पष्टता हवी असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Ajit Pawar On Sanjay Raut : 'माझ्यात आणि संजय राऊत यांच्यात..', अजित पवारांचा खुलासा