औरंगाबाद - साखरपुडा झालेल्या तरुणीच्या अपहरण प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने भाजप कार्यकर्त्याच्या मुसक्या आवळल्या. राहुल चाबुकस्वार असे पोलिसांनी अटक केलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याला स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री शहरातून अटक केली.
राहुल हा औरंगाबाद शहरातील भाजप कार्यकर्ता आहे. पैठण तालुक्यातील मायगाव येथील तरुणीचा साखरपुडा झालेला होता. या तरुणीच्या अपहरण प्रकरणी राहुलसह आशिष जाधव, तुषार राठोड, सुरेश राजने, सुधीर भारसाखळे या आरोपीं विरोधात 4 जूनला पैठण पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.