ETV Bharat / state

Kishor Agrawal Aurangabad : सोशल मीडियावर रिल्समुळे किशोर अग्रवाल झाले स्टार, असे तयार करतात कंटेन्ट - किशोर अग्रवाल यांना फेसबुककडून मानधन

सोशल मीडियावर आपली कला सादर करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. आपली क्रिएटिव्हिटी दाखवल्यास उत्पन्नाचे एक साधन म्हणून अनेक जण त्याकडे पाहतात. व्यावसायिक किशोर अग्रवाल यांचे अनेक फोलोअर्स फेसबुक आणि युट्यूबवर अनेक फोलोअर्स निर्माण झाले आहेत. महिन्याकाठी तेराशे ते चौदाशे डॉलर्स त्यांना फेसबुककडून मिळतात.

Kishore Agarwal Social Media Star
रिल्समुळे किशोर अग्रवाल झाले स्टार
author img

By

Published : Jan 25, 2023, 7:53 AM IST

Updated : Jan 25, 2023, 9:29 AM IST

रिल्समुळे किशोर अग्रवाल झाले स्टार

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर लोक चांगलेच सक्रिय झाले आहेत. जगातील वेगवेगळी माहिती एका क्लिकवर मिळत आहे. त्याचबरोबर अनेक कलाकार आपली कला त्या माध्यमातून सादर करत असताना पाहायला मिळत आहेत. औरंगाबादचे किशोर अग्रवाल यांचे व्हिडिओ सध्या चांगलेच चर्चेत येत असून, त्यांना मिळणारी पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता फेसबुकद्वारे त्यांना कमाई देखील मिळत आहे.

सोशल मिडीयामुळे आले चर्चेत : शहरात व्यावसायिक असलेले किशोर अग्रवाल गेल्या काही वर्षात सोशल मीडियामुळे अधिक प्रसिद्धी झाले. वेगळ्या प्रकारचे कॉमेडी व्हिडिओ त्यांनी तयार करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे उत्साह वाढत गेला आणि त्यांनी पहिल्यापेक्षा चांगले व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असून फेसबुकवर दीड लाखांहून अधिक फोलोअर्स तयार करण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. काही व्हिडिओंना तर कोटींमध्ये पाहिले गेले आहे. सोशल मीडियामुळे किशोर अग्रवाल शहरातच नाही तर राज्यात एक सेलिब्रिटी झाले आहेत.

वृत्तवाहिनी पाहण्याची आवड : सोशल मीडियावर सेलिब्रेटी असलेले किशोर अग्रवाल यांना वृत्तवाहिनी पाहण्याची सवय आहे. वेळ मिळेल तेव्हा ते चालू घडामोडींवर लक्ष ठेवतात, त्यातूनच त्यांना चांगले व्हिडिओ तयार करण्याची कल्पना सुचली. विचार करताना एखादी नवीन कल्पना सुचली तर ते तातडीने आपल्याकडील डायरीमध्ये टिपतात. इतकच नाही तर रात्री झोपताना देखील ते आपली डायरी उशाशी ठेवतात. जेव्हा कल्पना सुचेल त्याच वेळेस ती टिपून त्यावर काम करतात. चांगला कंटेंट तयार झाला की, त्यावर ते लगेच व्हिडिओ तयार करून आपल्या सोशल मीडिया पेजवर अपलोड करतात.

कोविड काळात तयार केले व्हिडिओ : कोविड सारख्या महामारीच्या काळात प्रत्येकाला घरी बसावे लागले. त्या काळात मुंबईत काही दिवस आपल्या मुलाकडे किशोर अग्रवाल राहत होते. घरात बसल्या बसल्या व्हिडिओ रेकॉर्ड करायला त्यांनी सुरुवात केली. कधी पत्नी तर कधी मुलगा तर कधी मित्रमंडळी यांच्या व्हिडिओची शूटिंग करायचे. औरंगाबादमध्ये आल्यानंतर मित्रपरिवाराने त्यांना साथ दिली. हळूहळू प्रसिद्धी मिळायला लागली. त्यानंतर आता अनेकजण स्वतःहून आमच्यासोबत व्हिडिओ काढा असा आग्रह त्यांच्याजवळ धरतात. इतकेच नाही तर कधी कधी बाहेर गेल्यावर भेटणाऱ्या प्रतिसादामुळे त्रास देखील होतो, असे मत किशोर अग्रवाल यांनी व्यक्त केले. एखादा सेलिब्रिटी झाल्यासारखे वाटते असे देखील त्यांनी सांगितले.

फेसबुक देत आहे मानधन : किशोर अग्रवाल यांची फेसबुकवरील फॅन फोलोईंग चांगलीच वाढली आहे. प्रत्येक व्हिडिओला लाखांच्या घरात लाईक मिळतात. त्याहून अधिक संख्येने त्यांचे व्हिडिओ पाहिले जातात. त्यामुळेच फेसबुकने त्यांना मानधन सुरू केले आहे. महिन्याकाठी तेराशे ते चौदाशे डॉलर्स त्यांना देण्यात येतात. त्यानंतर त्यांना मिळालेले लाईक, स्टार्स याचे वेगळे मानधन देण्यात येत आहे. इंस्टाग्रामवर लवकरच मानधन सुरू होईल तर, युट्युबमध्ये आता रिल्स प्रकाराला मान्यता दिली आहे. तिथे देखील फॅन फॉलोविंग वाढेल असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधन हे झाले पाहिजे. मात्र, त्यात येणारा अश्लील पणा चुकीचा आहे. सोशल कंटेंटमध्ये घरी लहान मुले देखील आजकाल मोबाईल हाताळत असतात. त्यावेळी अश्लील कमेंट त्यांच्या पाहण्यात आले तर, निश्चित त्यांच्या मानसिकतेत परिणाम होऊ शकतो. या गोष्टीचा सदुपयोग झाला पाहिजे असे मत किशोर अग्रवाल यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी वकील नीला गोखले यांची नियुक्ती

Last Updated : Jan 25, 2023, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.