औरंगाबाद: बदलीच्या कामासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे याने वन खात्यातील एकाची बदली करण्यासाठी दोन लाख रुपये घेतले. मात्र काम केले नसल्याने पैसे परत मागण्यासाठी संबंधित व्यक्तीने तगादा लावला. त्याबाबत मोबाईलवर झालेले संभाषण समोर आले. त्यात ऋषी खैरे याने पैसे परत करतो असे सांगितले. याबाबत तक्रारदारासोबत संपर्क झाला नाही. मात्र, ऋषी खैरे यांनी त्यांची बाजू मांडली.
मविआच्या काळात पैसे घेऊन बदल्या? कोरोनाच्या आधी माझा एक मित्र त्याच्या पत्नीची बदली करण्यासाठी माझ्याकडे आला होता. त्यावेळी ठाकरे सरकार असल्याने करून देऊ, असे मी त्याला सांगितले होते. पण अचानक कोरोना आला आणि त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडल्याने बदलीचे काम होऊ शकले नाही. पण, त्यांचे काय पैसे माझ्याकडे असतील ते देण्यासाठी मी तयार असल्याचे ऋषिकेश खैरे म्हणाले. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात पैसे देऊन बदल्या केल्या जात होत्या का? या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले.
हेही वाचा : Bharat Gogawale On Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! भरत गोगावलेंचा ईटीव्हीशी बोलताना दावा