औरंगाबाद (कन्नड) - माजी आमदार नारायणराव नागदकर अंबाडी प्रकल्पाशेजारील अंबाडी शासकीय रोपवाटिकेत दडून बसलेला जंगली तडसाला सुखरूप पकडण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या टीमला यश आले आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, अंबाडी रोपवाटिकेत तडस दडून बसल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागातील लागवड अधिकारी श्रीमती सी.बी.बाणखेले यांनी दिली होती. तसेच, जंगली प्राण्यास जंगलात नेऊन सोडण्याची विनंती केली. त्यानुसार कन्नड येथील सहाय्यक वनरक्षक तथा रेस्क्यू टीमने या तड़सास पकडून मकरणपूर रोपवाटिका येथे वनकर्मचारी व पशुवैद्यकीय तपासणीत निगराणीत ठेवण्यात आलेले होते.
पशुवैद्यकीय अधिकारी पी. डी. चव्हाण यांनी तडसाची आरोग्य तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास योग्य असल्याबाबत खात्री करून वरीष्ठ परवानगीने गौताळा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
यावेळी प्रवीण कोळी, वनपरिमंडळ अधिकारी, रेस्क्यू टीम औरंगाबाद सद्यस्य एम. ए. शेख यांचेसह वनसेवक सईद शेख , अशोक आव्हाड वाहनचालक विकास बनकर उपस्थित होते.