ETV Bharat / state

Maratha Reservation: आरक्षणासाठी आत्महत्या करतात पण नंतर कोणी विचारेणा; आईने व्यक्त केला अनुभव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 11:01 PM IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला असतानाच दोन दिवसापूर्वी सुनील कावळे यांनी आत्महत्या केली. मराठा समाज आक्रमक होत असताना, पुन्हा एकदा आत्महत्या पाहायला मिळाल्याने, २०१८ मधे आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या आईने आधी आमचे हाल बघा, असं करू नका अशी कळकळीची विनंती केलीय.

Chhatrapati Sambhajinagar News
आरक्षणासाठी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या प्रमोद होरे याच्या आईने आपली आपबीती सांगत, सरकार काय समाजही पाठीशी उभा राहत नाही. आपलं आपल्यालाच जीवन काढावं लागतं असं अनुभव त्यांनी सांगितली. कोणत्याच युवकाने आत्महत्येचे पाऊल उचलून नये, स्वतःच्या कुटुंबाकडे पहाव. तर सरकारनेही आरक्षण द्यावं म्हणजे युवकांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असं मत प्रमोद यांच्या आई जयमाला होरे त्यांनी व्यक्त केला.

प्रमोद होरे याने केली होती आत्महत्या : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाजाने शांततेच्या मार्गातून ५८ मोर्चे काढत राज्याला मागण्याची दखल घेण्यास भाग पाडले. मात्र २०१८ मध्ये समाज आक्रमक झाला आणि त्यांनी ठोक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनाची दिशा बदलली. त्याच वेळी काकासाहेब शिंदे या युवकाने सर्वात पहिले समाजासाठी जलसमाधी घेत आपलं बलिदान दिलं. त्यानंतर अनेक युवकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच पत्र लिहीत आत्महत्या केल्या. त्यात चिकलठाणा येथे राहणाऱ्या प्रमोद जयसिंग होरे या उच्चशिक्षित युवकाने २९ जुलै २०१८ मध्ये रेल्वे रुळावर जाऊन आपला जीव दिला. त्याआधी त्याने फेसबुकवर आपला एक फोटो काढून आरक्षणासाठी आपण आपला जीव देत असल्याचं नमूद केलं होतं. उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नव्हती, त्यात पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी त्याच्यावर होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनांमध्ये त्यांना सक्रिय सहभाग नोंदवला समाजासाठी बलिदान दिलं तर, भावी पिढीचे भलं होईल असं त्याच्या मनात आलं आणि त्याने टोकाचे पाऊल उचललं. मात्र आज त्याच्या आईवर कष्ट करण्याची वेळ आली आहे.

आईवर कष्ट करण्याची वेळ : प्रमोद होरे उच्चशिक्षित तरुण होता, त्याने बीएससी ऍग्री हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता, तर ग्रामसेवक परीक्षेची तयारी करत होता. शिक्षण असूनही नोकरीसाठी त्याला संघर्ष करावा लागत होता. त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक आंदोलन त्या काळात झाले, त्यात प्रमोदने सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येक ठिकाणी तो जायचा आणि आरक्षण मिळवण्यासाठी आपणही काही करावं असं त्याला नेहमी वाटत होतं. त्यातूनच त्याने आत्महत्या करण्याचं टोकाचे पाऊल उचललं. सुरुवातीला राजकीय नेत्यांसह, मराठा क्रांती मोर्चाचे अनेक समन्वयक कुटुंबीयांना भेटून दिलासा देऊन परत आले. मात्र त्यानंतर कोणीही घराकडे फिरूनही पाहिला नाही. पुढे झालेल्या आंदोलनात प्रमोदची आई आणि वडील दोघेही सहभागी होत होते, मात्र कुटुंबाचे काय चाललं कोणीही विचारायला तयार नव्हतं. कालांतराने प्रमोदचे वडील जयसिंग होरे यांचही निधन झालं, कुटुंबात करता पुरुष उरला नाही. त्यामुळे आईवर कष्ट करण्याची वेळ आली आहे. घरात असलेलं छोट किराणा दुकान चालवुन त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागतोय. सरकारने जर आरक्षण दिलं असतं किंवा मुलांना नोकरी दिली असती, तर आज माझा मुलगा जिवंत असता आणि या वयात मला काम करण्याची वेळ आली नसती असं मत जयमाला होरे यांनी व्यक्त केलं.

घरचा कर थकला पैसे आणायचे कुठुन : प्रमोद होरे याला एक लहान भाऊ देखील आहे, मात्र त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याने तो कुठल्याही पद्धतीचे काम करू शकत नाही. तर त्याची पत्नी आणि मुलाला सांभाळण्याची जबाबदारी देखील प्रमोदच्या आई वरून पडली आहे. सरकारने दिलेली दहा लाखांची मदत सुनेच्या खात्यात आली. मात्र तिला दोन मुलं आहेत त्यांना तिला सांभाळायचे आहे. सुन दोन्ही मुलं घेऊन माहेरी राहते. घरात छोटेसे किराणा दुकान आहे त्यात कसबसं कुटुंब चालवण्याची वेळ आल्याचं मत जयमाला होरे यांनी व्यक्त केलं. आज घराची घरपट्टी पाणीपट्टी थकली असून, ती भरत नसल्यानं त्यावर व्याज लागत आहे. आज माझ्याकडे पैसे नाहीत पोट भरण्याची कष्ट करायची वेळ आली, विजेचे बिल कसेबसे भरते, मी हा कर कसा चुकवणार? असा प्रश्न पडलाय. सरकारने किमान माझा थकीत कर माफ केला तर यापुढे मी, जेवण कमी करेल मात्र पुढचा कर चुकवत राहील. मात्र सरकारने मदत करावी अशी कळकळीची विनंती प्रमोदची आई जयमाला होरे यांनी व्यक्त केली.

सरकारने आरक्षण द्यावे : दोन दिवसांपूर्वी सुनील कावळे या मराठा आंदोलने आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचा टोकाचे पाऊल उचलले. हे वृत्त कळतात त्याच्या आईवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना करवली गेली नाही, असं मत प्रमोदची आई जयमाला होरे यांनी व्यक्त केलं. आज सरकारने जर आरक्षण दिलं असतं तर परिस्थिती बदलली असती, मात्र तसं होत नाही. युवकांनी आत्महत्या करू नये, तुमच्या मागे अनेक जण अवलंबून असतात. त्याच भान त्यांनी ठेवलं पाहिजे. आज तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाला कोणीही पाहणार नाही, त्यामुळे असं करू नका अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. सरकारने देखील आता लवकरात लवकर आरक्षण द्यावे, जर त्यांनी मागणी पूर्ण केली तर युवकांना टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येणार नाही असं देखील जयमाला होरे यांनी सांगितलं.

अनेकांना नोकरी पण : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत ४८ जणांनी आत्महत्या करण्याचा टोकाचे पाऊल उचललं होते. त्यात आंदोलनात सक्रिय असलेल्या कावळे यांनी आत्महत्या केल्याने आधीच्या झालेल्या आत्महत्यांबाबत विचार करायला भाग पाडलं. त्यावेळी सरकारने आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेऊ असा आश्वासन दिलं आणि काही अंशी ते आश्वासन पूर्ण देखील केलं. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील २० ते २२ जणांना आतापर्यंत राज्य परिवहन म्हणजेच एस.टी मध्ये नोकरीला लावण्यात आलं. मात्र कायमस्वरूपी काम न देता रोजंदारीवर त्यांची भरती करण्यात आली. दिवसाला पूर्ण वेळ काम केल्यावर सहाशे रुपये त्यांच्या पदरी पडतात, त्यात साप्ताहिक सुट्टी किंवा इतर सुट्ट्या घेतल्या तर त्याचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे आजच्या वाढत्या महागाईच्या जगात मिळत असलेल्या वेतनात कुटुंब चालवणार शक्य होत नाही. परिणामी, कुटुंबातील इतर सदस्य इतरत्र कामाला किंवा शेतात मूलमजुरीला जात असल्याचं वास्तव काही कुटुंबीयांनी व्यक्त केलं. आंदोलन करताना अनेक नेते समाजाचे नेतृत्व करत असल्याचा आव आणतात, मात्र त्याच समाजात आत्महत्या केलेल्या कुटुंबांना सावरण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे या आत्महत्या कशासाठी? असा प्रश्न मराठा युवकांनी स्वतःला विचारण्यास हरकत नाही असच म्हणावं लागेल.

हेही वाचा -

Manoj Jarange Patil Sabha Video : 'मराठा समाजाच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार; इंचभर मागं हटणार नाही'

Manoj Jarange Patil : चार वर्षांमध्ये ओबीसींची 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली? मनोज जरांगे पाटलांचा सवाल

Manoj Jarange Patil Sabha : विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षण पारित करा; मनोज जरांगेंची मागणी

माहिती देताना प्रतिनिधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.