औरंगाबाद - जिल्ह्यातील सर्व जैन धर्मीयांनी अत्यंत शांततेने व भगवान महावीरांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा, अपरिग्रह व परस्परग्रहो जिवानाम, जियो और जिने दो, या तत्वासह शासनाच्या लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करून कोरोनाला न घाबरता महावीर जयंतीचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच साजरे केले.
महावीर जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये हुकूमचंद पांडे आणि कुटुंबीयांनी 1 लाख 8 हजार रुपये तसेच ते अध्यक्ष असलेल्या अग्रसेन बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 1लाख 1 हजार रुपये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या प्रत्येकी 500 रुपये किमतीच्या 108 किट दिल्यात. हुकूमचंद पांडे व कुटुंबीयांनी गरजूंना किटचे वाटप केले व रकमेचे आरटीजीएस व धनादेश महावीर जयंतीच्या दिवशी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाटे व तहसीलदार संजय वारकड यांच्या सुपूर्द केले.
यावेळी आमदार उदयसिंग राजपूत उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, तालुका आरोग्य अधिकारी बाळकृष्ण लांजेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. धिरज पाटील, डॉ. प्रवीण पवार, पो.नि. रामेश्वर रेंगे, सुनील नेवसे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड एपीआय जगदीश पवार, संजय आहिरे, नायब तहसीलदार शेख हारून, स्वप्नील खुल्लम, सत्यजित आव्हाड, आशिष सुरपाम अग्रसेन बँकेचे उपाध्यक्ष बाबुराव घुगे, संचालक मजीद भाई, मॅनेजर जयंत कुलकर्णी, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष प्रशांत जालनापुरकर, अनिल पांडे, पवन चुडीवाल शेख अतिक हे उपस्तिथ होते.
महावीर जयंतीच्या निमित्ताने मारवाडी मिडटाऊन कन्नड शाखेच्या वतीने डिजिटल महावीर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कन्नडसह मराठवाडा, मुंबई पुणे येथील 74 जणांनी डिजिटल सहभाग नोंदवला व मारवाडी मिडटाऊनच्या अध्यक्षा तन्वी जालनापुरकर यांच्या प्रेरणेने सचिव सोनल कांकरिया, प्रांजल लोहाडे, प्रिती भारुका, आयुशी भारुका, पायल ठोळे, सारिका पांडे, कीर्ती भारुका, सविता लोहाडे, पूजा अग्रवाल, पिंकी भारुका, पायल पांडे, माधुरी भारुका, कोमल ठोळे, सीमा पांडे, नेहा पांडे, विना जैन, पायल गन्गवाल, अमृता चुडीवाल, कविता भारुका, दीपाली पाटोदी, मोनिका पहाडे, नम्रता अग्रवाल, विभा भारुका, सोनाली ठोलिया, उषा भारुका इत्यादींनी डिजिटल पद्धतीने त्याचे प्रक्षेपण करून डिजिटल महावीर जयंती साजरी केली. यामध्ये सर्व जैन मंडळ, महावीर मित्र मंडळ, महिला मंडळ इत्यादींनी आपापल्या घरूनच सोशल डिस्टन्सिंग ठेवून सहभाग नोंदवला.