छत्रपती संभाजीनगर : रशिया एक महाशक्ती म्हणून जागतिक स्तरावर ओळखली जाते. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन राहत असलेले ठिकाण हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानला जाते. मात्र असे असले तरी बुधवारी रात्री दोन ड्रोन द्वारे तिथे हल्ला केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यांच्याकडे असलेली यंत्रणा पाहता मोठे मिसाईल पाडण्याची क्षमता, ड्रोन दोन रोधक असलेली यंत्रणा तिथे कार्यान्वित आहे. त्यामुळे हा हल्ला प्रथम दर्शनी तरी इतर कोणी केला असावा याची शक्यता नाकारता येते. युक्रेन सारखा छोटा देश एवढी मोठी गोष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे या कृतीत साशंकता व्यक्त करायला हरकत नाही. जागतिक पातळीवर सहानुभूती मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न असू शकतो असे मत डॉ. ढगे यांनी व्यक्त केले
सहनभुती मिळवण्यासाठी प्रयत्न: नऊ मे रोजी व्हिक्ट्री डे साजरा केला जातो, त्यासाठी जगभरातून अनेक नेते अधिकारी रशियामध्ये येत असतात. याच काळात झालेला हल्ला ही गांभीर बाब देखील मानली जाते असे मत डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या चौदा महिन्याच्या काळात युक्रेन अध्यक्ष झेलस्की यांनी प्रति हल्ला करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे प्रतिउत्तर देताना रशियाला आक्रमकता वाढवावी लागणार आहे. मात्र त्यात युद्धाच्या काळात रशियन नागरिकांकडून पुतीन यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्याला उत्तर देण्यासाठी आता भूमिका घेणे आवश्यक असून, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची देखील गरज निर्माण झाली आहे. तर युद्ध लादल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर लावण्यात येणारे निर्बंध पाहता, सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे नीती राबवली जाण्याची शक्यता आहे. आमच्या अध्यक्षांवर हल्ला झाला आता आम्ही आक्रमकपणे उत्तर देऊ असा इशारा, या निमित्ताने देण्यात येत असल्याचे संकेत यातून मिळत असल्याच देखील ढगे यांनी सांगितले.
हल्ला होण्याची शक्यता माहीत होती: रशिया आणि युक्रेन यांचा युद्धाचा काळ खूप मोठा झाला आहे. रशियाच्या तुलनेत अतिशय लहान असलेल्या युक्रेनने चिवट लढा दिला. याच काळात रशियाला आपल्या अध्यक्षांवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता माहीत होती, त्यामुळे त्याबाबत सुरक्षा यंत्रणा सतर्क असताना हल्ला झाला कसा असा? प्रश्न देखील उपस्थित होत आहे. या हल्ल्यांची शक्यता पाहता या आधीच पुतीन यांचे डुप्लिकेट तयार करून ते इतरत्र वावरत होते. यात खरे कोणते आणि खोटे कोणते हे कोणालाही कळणे शक्य नव्हते. काही कार्यक्रमांमध्ये पुतिन यांचा वावर दिसत होता, मात्र ते खरे पुतीन आहेत का? असा प्रश्न देखील विचारला जात होता. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत असलेली शक्यता आधीपासून वर्तवलेली असल्याने या हल्ल्यात शंका नक्कीच व्यक्त होते.
युद्धात आक्रमकता वाढण्याचे संकेत: रशिया आणि युक्रेन यांचा हल्ला जागतिक स्तरावर चांगलाच गाजला. 14 महिने सुरू असलेले हे युद्ध आगामी काळात आक्रमक होण्याची शक्यता या हल्ल्याच्या रूपातून समोर आले. त्यामुळे या दोन्ही देशातील नागरिकांना याचे परिणाम भोगावे लागणार आहेत, मात्र त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर देशांना देखील त्याच्या परिणाम भोगाव लागेल असे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी व्यक्त केले.