औरंगाबाद - कोरोना संकट काळात नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढलं असून यात विषारी औषध पिवून आत्महत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. घाटी रुग्णालयात औषध प्राशन केलेल्या रुग्णांवर संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला. यात शहरी भागातील १५ टक्के नागरिकांनी तर ग्रामीण भागातील तब्बल ८५ टक्के नागरिकांनी विषारी औषध प्राशन केलं आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी पिकांवर फवारणी करण्यासाठी औषध वापरले जाते. संशोधनातून आलेल्या आकडेवारीनुसार १५ टक्के शहरी, ८५ टक्के ग्रामीण भागातील नागरिकांनी तर महिलांच्या तुलनेत ५७ टक्के पुरुष ४३ टक्के महिलांचा समावेश विषारी औषध प्रशासन केले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक उपचार स्थानिक पातळीवर मिळाल्यास रुग्णाची गुंतागुंत टाळता येते. त्यामुळे नागरिकांनी प्राथमिक उपचार स्थानिक पातळीवर घ्यावे, असे आवाहन डॉ. भट्टाचार्य यांनी केले.
अविवाहितांच्या तुलनेत विवाहितांची संख्या अधिक -
विवाह झालेल्या ७७ टक्के नागरिकांनी वेगवेगळ्या कारणांनी विषारी औषध प्राशन केले आहे. तर १५ टक्के अविवाहित नागरिकांचा समावेश आहे. तसेच ५७ टक्के पुरुष तर ४३ टक्के महिलांचा समावेश आहे. वयोगटानुसार सर्वाधिक संख्या ही २० ते २९ वयोगटातील ३४ टक्के आहे. विषारी औषध प्राशन करणाऱ्यांची वेगवेगळी कारणं आहेत. यात आर्थिक, कौटुंबिक, वैवाहिक, प्रेम प्रकरण, व्यसनाधीनता, कर्ज, शैक्षणिक इत्यादी प्रमुख कारणातून विषारी औषध प्राशन केल्याची माहिती संशोधनातून समोर आली.
संशोधनात्मक अभ्यासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, फार्मसी कॉलेजचे विभागप्रमुख डॉ. सुनील बोथरा यांच्या मार्गदर्शाखाल अनुजा जोसे, रसिका देशपांडे, अश्विनी कुंटे, ओंकार ओक यांचा समावेश आहे.