ETV Bharat / state

Honour killing : महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, रुपाली पाटील ठोंबरेंची केस लढवण्याची तयारी - Vaijapur massacre incident

वैजापूर हत्याकांडात आक्रमक होत महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक लाइव्ह करत पोस्ट केली. ( Vaijapur massacre incident ) वेदनादायी! न्याय होणारच! वैजापूर बहिणीची मुंडके कोयत्याने धडपासून वेगळे करून सेल्फी काढणाऱ्या नराधमाला फाशीच व्हावी असही त्या म्हणाल्या आहेत. ( Brother Beheads Sister Vaijapur ) आई वडिलांनी पोटचा गोळा क्रूरपणे मारण्याला हातभार, समाज म्हणून आपणही या विषयाला जबाबदार आहोतन का?

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Dec 8, 2021, 11:58 AM IST

औरंगाबाद (वैजापूर) - वैजापूर हत्याकांडात आक्रमक होत महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक लाइव्ह करत पोस्ट केली. वेदनादायी! न्याय होणारच! वैजापूर बहिणीची मुंडके कोयत्याने धडपासून वेगळे करून सेल्फी काढणाऱ्या नराधमाला फाशीच व्हावी असही त्या म्हणाल्या आहेत. ( Honour killing Vaijapur taluk of Aurangabad district. ) आई वडिलांनी पोटचा गोळा क्रूरपणे मारण्याला हातभार, समाज म्हणून आपणही या विषयाला जबाबदार आहोत? मुलीचा पती व कुटुंब, सामाजिक संघटना, प्रशासन यांच्या सहकार्याने मी ही केस वकील म्हणून फक्त १/- रुपये मानधनात लढण्यास तयार आहे असही त्या म्हणाल्या आहेत.

व्हिडिओ

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात राहणाऱ्या 19 वर्षीय कीर्ती थोरेने पळून जाऊन लव्ह मॅरेज केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. ज्या ताईने हातावर राखी बांधली, तिच्याविषयी भावाच्या मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

ज्युनिअर कॉलेजपासून मैत्री

लेकीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर आईने तिच्याशी संबंध तोडले होते. 19 वर्षीय तरुणीने ज्युनिअर कॉलेजपासून मैत्री असलेल्या तरुणाशी विवाह केला होता. हा आंतरजातीय विवाह नव्हता, मात्र पळून जाऊन कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या भावनेतून या दोघांनी ही हत्या केल्याची माहिती आहे.

बहिणीच्या घरी जाऊन डोकं उडवलं

ताईला भेटण्याच्या निमित्ताने भाऊ आणि आई रविवारी तिच्या घरी गेले होते. त्यावेळी बहीण चहा बनवत असताना स्वयंपाकखोलीत जाऊन कोयत्याने सपासप वार करत भावाने तिची निर्घृण हत्या केली. बहिणीचं डोकं शरीरापासून वेगळं होईपर्यंत तो वार करत राहिला. कळस म्हणजे त्यानंतर छाटलेल्या मुंडक्यासोबत मायलेकाने सेल्फीही काढला आहे.

हेही वाचा - Nagaland killings: 'राजाने मारले तर जनता न्याय करते', नागालँडच्या घटनेवर सामनातून प्रहार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.