ETV Bharat / state

पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण सिंचन योजनेचा पहिल्या टप्प्याचा शुभारंभ - bramhgavhan irrigation policy in paithan

बुधवारी सकाळी जायकवाडी येथील पंप हाऊस येथून एक पंप सुरू करून धरणातील पाणी खेर्डा प्रकल्पाच्या दिशेने झेपावले. ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

bramhgavhan irrigation policy
पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण सिंचन योजनेचा पहिल्या टप्प्याचा शुभारंभ
author img

By

Published : Apr 15, 2020, 8:13 PM IST

औरंगाबाद - पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण सिंचन योजनेचा पहिला टप्पा मार्गी लागला असून तालुक्यातील 55 गावाचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या सिंचन योजनेतून सुटणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी जायकवाडी येथील पंप हाऊस येथून एक पंप सुरू करून धरणातील पाणी खेर्डा प्रकल्पाच्या दिशेने झेपावले. ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण सिंचन योजनेचा पहिल्या टप्प्याचा शुभारंभ

यावेळी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी बांधकाम सभापती विलास भुमरे, पाटबंधारे विभागाचे अभियंता अनिल निभोरे, शेतकरी उपस्थित होते. संबंधित सिंचन योजनेची गेल्या महिण्यात चाचणी घेण्यात आली होती.

जायकवाडी धरणातून पाईपलाईनद्वारे हे पाणी ववा येथे पोहोचते. त्यानंतर तिथून पुढे कॅनॉलमधून खेर्डा प्रकल्पात पोहचणार आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांना पाणी पाहुन आनंद होणे साहजिकच असल्याने गेल्या दहा वर्षाचा बहुचर्चित पाणी प्रश्न मार्गी लागल्याने भुमरे यांचे शेतकरी आभार व्यक्त करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.