ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये कार दुचाकीच्या अपघातात एक महिला ठार, एक गंभीर जखमी

author img

By

Published : Jan 31, 2021, 9:03 PM IST

Updated : Jan 31, 2021, 10:26 PM IST

कार दुचाकीच्या अपघातात एक महिला ठार, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबाद-पुणे महामार्गावर जिकठाण फाट्याजवळ आज दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मधुराबाई सुकासे, असे मृत महिलेचे नाव आहे.

Car bike accident Aurangabad
कार दुचाकी अपघात औरंगाबाद

औरंगाबाद - कार दुचाकीच्या अपघातात एक महिला ठार, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबाद-पुणे महामार्गावर जिकठाण फाट्याजवळ आज दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मधुराबाई सुकासे, असे मृत महिलेचे नाव आहे.

अपघातग्रस्त कारचे दृष्य

हेही वाचा - मुलाला शाळेतून घरी पाठवल्याने, पालकाने दिला शिक्षकाला चोप

लक्ष्मण लंघे हे त्यांच्या मावशी मधुराबाई कडूबाल सुकासे यांना दुचाकीने (क्र. एम. एच.20 सी झेड 6026) वाळूज येथे घेऊन जात होते. दरम्यान, माघून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने (क्र. एम.एच.12 के.वाय 9791) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला धडक दिल्याने कारचे नियंत्रण सुटून ती 100 फुट लांब असलेल्या सिमेंट कम्पाउंडला धडकली.

घटनेचे वृत्त समजताच नागरिकांच्या मदतीने वाळूज पोलिसांनी दुचाकीवरील दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले. तपासणीनंतर मधुराबाई यांना मृत घोषित केले, तर लक्ष्मण लंघे (रा. पिपळवाडी) हे गंभीर जखमी आहे. कारमधील दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद जिल्हा रुग्णालय (घाटी) येथे पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराज की जय! गंगापूरमध्ये भव्य मिरवणूक काढत अश्वारूढ पुतळ्याची स्थापना

Last Updated : Jan 31, 2021, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.