औरंगाबाद - सततच्या पावसामुळे जायकवाडी धरण पुन्हा एकदा आपल्या पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातून मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
जायकवाडी धरणाच्या सांडव्यातुन सुरु असलेल्या 43509 क्यूसेक पाण्याच्या विसर्गात वाढ करून 51893 क्यूसेक पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या जवळपास 23 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कुणी आपले जनावरे सोडू नयेत, कोणतीही जीवित/ वित्त हाणी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी असे जायकवाडी पाटबंधारे प्रशासन यांच्या मार्फत कळविण्यात येत आहे.
हेही वाचा - कल्याण काळेंच्या पराभवाने औरंगाबाद जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?
जायकवाडी धरणामधून शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता 16 दरवाजे हे 2 फुट 6 इंचने वाढवून ३ फूट उंचीने करण्यात आले असून 8384 क्यूसेक विसर्ग नदीपात्रात वाढवण्यात आला आहे. सद्यास्थितीत सांडव्यातुन 50304 व जलविद्युत केंद्रामधून 1589 क्यूसेक असा एकुण 51893 क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. ह्या विसर्गमुळे नदीपात्रात वाढ होऊन ती दुथडी भरून वाहत आहे.
हेही वाचा - औरंगाबाद पश्चिम मधून संजय शिरसाठ यांची हॅटट्रिक