औरंगाबाद - शहरात एक हॉटेल चालक ग्राहकाला बेदम मारहाण करत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी ग्राहक आणि चालक दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये सतीश हजारे असे मारहाण करणाऱ्या हॉटेल चालकाचे नाव आहे, तर अभिजित नावगीरे असे मारहाण झालेल्या ग्राहकाचे नाव आहे.
पुंडलीकनगरमधील जय भवानी चौकातील एका हॉटेलमध्ये ग्राहक आणि हॉटेल स्टाफमध्ये लाठ्या, काठ्या आणि तलवारीने हाणामारी झाली होती. या भांडणात दोन्ही गटातील 7 जण जखमी झाले आहेत. या भांडणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्यामध्ये हॉटेल चालक ग्राहकाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे.