औरंगाबाद : अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री हिलरी क्लिंटन यांनी बुधवारी वेरूळ लेणीसह घृष्णेश्वर मंदिरात भेट दिली. लेणी परिसरात अडीच तास त्यांनी पाहणी केली. जगाला भुरळ घालणाऱ्या वेरूळ लेणी ने हिलरी क्लिंटन यांनी भुरळ घातली. त्या काळात सुविधा नसताना साकारलेल्या कलाविष्कार पाहून अद्भुत असल्याचे उद्गार त्यांनी काढले. क्लिंटन यांनी चार लेणी पहिल्या. त्या औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत.
वेरूळ लेणीने घातली भुरळ : जगविख्यात वेरूळ लेणीने अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हेनरी क्लिंटन यांना देखील भुरळ घातली. बुधवारी सकाळी त्या वेरूळ लेणी परिसरात दाखल झाल्या. लेणी क्रमांक 10, 16, 32 आणि 33 या चार लेण्या त्यांनी पाहिल्या. जवळपास अडीच तास त्या लेणी परिसरात त्या काळात केलेल्या अविष्काराची पाहणी करत होत्या. औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी जैन, बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचा दर्शन दाखवणारी एकमेव लेणी आहे. या परिसरात त्यांनी या तिन्ही प्रकारच्या लेण्या पाहून आश्चर्य व्यक्त केले. या लेण्या म्हणजे अद्भुत अविष्कार आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
विमानतळावर स्वागत : हिलरी डायना रॉडम क्लिंटन मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासाठी आणि सोबत असलेल्या सहायक आणि सुरक्षा रक्षक यांच्यासाठी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली होती. विमानतळाच्या बाहेर आल्यावर त्यांनी हात हलवत उपस्थितांचे स्वागत स्वीकारले. आंतरराष्ट्रिय पाहुण्या असल्याने त्यांच्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांच्यासाठी असलेल्या वाहनांची श्वान पथक मार्फत तपासणी करण्यात आली. विशेष विमानाने आलेल्या हेनरी क्लिंटन विशेष वाहनाने खुलताबाद तालुक्याकडे रवाना झाल्या होत्या.
दोन दिवसीय दौरा : युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या माजी विदेश मंत्री दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत. सात फेब्रुवारीला अहमदाबाद येथून खाजगी विमानाने त्या औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्या, तेथून ध्यान फार्म्स सहाजतपूर तालुका खुलताबाद येथे त्या मुक्कामी असतील. आठ फेब्रुवारीला घुश्मेश्वर मंदिर व वेरूळ लेणी येथे भेट दिली. त्यानंतर पुन्हा ध्यान फार्म्स शहाजपुर येथे मुक्काम करून 9 फेब्रुवारीला त्या पुढील ठिकाणी जाणार आहेत.
स्वागतासाठी तगडा पोलीस बंदोबस्त : अमेरिकेच्या माजी प्रथम महिला हिलरी डायना रॉडम क्लिंटन शहरात - जिल्ह्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस दलातील शंभरून अधिक कर्मचारी दहा ते पंधरा पोलीस अधिकारी तैनात असणार आहेत. प्रवास करताना रस्त्यात, मुक्कामाचे ठिकाण, वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर आदी ठिकाणी पहिलेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर विमानतळावर आवश्यक, अशी खबरदारी देखील घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा : Adil Durrani In Judicial Custody : राखी सावंतचा पती आदिल दुर्राणीला न्यायालयीन कोठडीत