औरंगाबाद - सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना एक ट्रक भरुन जीवनावश्यक वस्तूची मदत येथील इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठविली आहे. यामध्ये औषधे, खाद्य पदार्थांची पाकिटे, कपडे या वस्तूंचा समावेश आहे. या संघटनेचे अध्यक्ष भावेश सराफ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सांगली कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजविला आहे. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, मुबलक औषधे नाहीत. तेथील नागरिकांना बदलायला कपडे देखील नाहीत. अशा पुरग्रस्तांना माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात म्हणून, शहरातून इंटरनॅशनल ह्युमन राईट्सच्या पदाधिकाऱ्यांनी कपडे, ड्राय फ्रुट, बिस्कीट पाकिटे, औषधाचा साठा एका ट्रकद्वारे शनिवारी कोल्हापूर-सांगलीकडे रवाना केला आहे. मंगळवारी आणखी दोन ट्रक जीवनाश्यक वस्तूंची मदत पूरग्रस्तांना पाठविली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भावेश सराफ यांनी दिली आहे.