ETV Bharat / state

Unseasonal Rain: दिवसाचं पडला अंधार; अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, शहरवासीयांची उडाली तारांबळ - शहरवासीयांची उडाली तारांबळ

हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार शहरात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. भरदुपारी सायंकाळ होत असल्याचा अनुभव नागरिकांना आला. सर्वत्र काळोख पसरला, जोरदार वादळी वारे वाहू लागले आणि काही क्षणात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा उन्हाळा सुरू की पावसाळा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.

Unseasonal rains begin
अवकाळी पावसाला सुरूवात
author img

By

Published : Apr 28, 2023, 9:52 PM IST

पावसामुळे शहरामध्ये भर दिवसा रात्र असल्यासारखी परिस्थिती निर्माण

छत्रपती संभाजीनगर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातले असून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे.राज्यात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने दर्शवण्यात आली आहे. शहरामध्ये भर दिवसा रात्र असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. काळ्या ढगांनी एकदम शहरांमध्ये भर दिवसा अंधार पडला आहे. समोर असलेली व्यक्ती देखील स्पष्ट दिसेनाशी झाली होती. तर सोसाट्याचा वारा देखील सुटला काही वेळातच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक बदललेल्या या वातावरणामुळे शहरवासीयांची चांगलीच धावपळ झाली आहे. तर वाहनधारकांना दिवसा वाहनाचे लाईट लावून गाडी चालवावी लागली.

अचानक वातावरणात बदल झाला: दोन दिवसांपासून पाऊस पडेल असे वातावरण होते. मात्र ढग दाटून आले, जोराचा वारा सुटला तरी पाऊस पडला नाही. मात्र सकाळ पासून अचानक वातावरणात बदल झाला आणि दमदार पावसाने हजेरी लावली. तर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार आणि वादळी वाऱ्याच्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे चित्र समोर आले आहे. पत्र्याची घरे असणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शहराला पावसाने झोडपले: आज दुपारी 12:40 ते 01:30 दरम्यान छत्रपती संभाजीनगरला वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह पावसाने झोडपले. सुरुवातीस काळ्या ढगांनी आकाश झाकून गेल्याने शहरावर अंधार जाणवु लागला अचानक सोसाट्याचा वारा आल्याने, अनेक ठिकाणी या वेगवान वाऱ्याचा सामना करणे कठीण गेले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. या वेळी एमजीएम विद्यापीठातील हवामान वेधशाळेत वाऱ्याचा वेग ताशी 42 किलोमीटर नोंदवला आहे. सोबतच जोरदार पावसाने देखील हजेरी लावली. यादरम्यान 13.7 एमएम एकूण पावसाची नोंद झाली. अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. पुढील पाच ते सहा मे तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशाच जोरदार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather पुढील सात दिवस पावसासह गारा पडण्याची शक्यता विदर्भात तीन दिवस ऑरेंज अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.