ETV Bharat / state

कारागृहात कैदी गिरवताहेत 'ए फॉर अ‌ॅपल..चे धडे, इंग्रजी शिकण्याचा बांधला चंग

दोन तास हर्सूल कारागृहातील 55 कैदी भीती विसरून इंग्रजी भाषा बोलायची कशी हे शिकत आहेत.

harsul jail prisoners
इंग्रजीची भीती विसरून कैदी गिरतावये धडे; हर्सूल कारागृहातील चित्र
author img

By

Published : Feb 28, 2020, 8:36 PM IST

Updated : Feb 29, 2020, 1:01 PM IST

औरंगाबाद - इंग्रजी बोलता यावं असं सर्वांनाच वाटत असत. इंग्रजी आली तर आपण जगाशी स्पर्धा करू शकतो, असा विचार आज प्रत्येकालाच येतो. त्यासाठी अनेकजण इंग्रजी शिकण्यासाठी विशेष शिकवणी देखील लावतात. मात्र, कारागृहातील कैदी इंग्रजी शिकत आहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. होय औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील कैदी आता इंग्रजी भाषेचे धडे गिरवत आहेत.

इंग्रजीची भीती विसरून कैदी गिरतावये धडे; हर्सूल कारागृहातील चित्र

हेही वाचा - बीएस-६ इंजिन क्षमतेच्या वाहनांचे पेट्रोल-डिझेल १ एप्रिलपासून महागणार

कैदी म्हटलं की डोळ्यासमोर अत्याचार, गुन्हे करणारा असं काहीसं चित्र उभे राहते. कारागृहात शिक्षा भोगल्यावर अनेक कैदी सुधारतात. मात्र, बाहेर आल्यावर त्यांना आत्मविश्वास व रोजगार मिळावा यासाठी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात कैद्यांना इंग्रजी शिकवण्याचा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. जवळपास 55 कैदी आता इंग्रजी भाषा शिकत आहेत.

कारागृहात रोज सकाळी 'ए फॉर अ‌ॅपल', 'बी फॉर बॉल' असा आवाज ऐकू येत आहे. कारागृहातील पन्नासहून अधिक कैदी उच्चशिक्षण घेत आहेत. कोणी पदवी तर कोणी पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे. उच्च शिक्षण जरी हे बंदी घेत असले तरी इंग्रजी भाषेचं म्हणावं तस ज्ञान त्यांना नाही. शिक्षा संपल्यावर त्यांना शिक्षणाच्या जोरावर नवे आयुष्य उभे करता यावे, यासाठी कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी कैद्यांसाठी इंग्रजी शिकवण्यासाठी काही करता येईल का? अशी विचारणा सुरू केली. त्यावेळी सामाजिक संस्थांच्या वतीने उच्चशिक्षण घेणाऱ्या आणि त्यांच्यासह ज्या बंदीना इंग्रजी भाषा शिकायची आहे अश्या बंदीसाठी इंग्रजी शिकण्यासाठी विशेष शिकवणी सुरू करण्यात आली आहे.

सुरुवातीला अवघे 25 ते 30 बंदी इंग्रजीचे धडे गिरवत होते. मात्र, आठच दिवसात आता जवळपास 55 बंदी इंग्रजी शिकण्यास तयार झाले असून, रोज दोन तास त्यांच्यासाठी विशेष शिकवणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. इंग्रजी शिकताना बंदी जास्त प्रतिसाद देणार नाही असे वाटत होते मात्र, बंदीचा प्रतिसाद पाहता एक तासाचा वर्ग आता दोन तास तर कधी तास देखील शिकवावे लागत असल्याचे इंग्रजी शिकवणाऱ्या मोहन कोरडे यांनी सांगितले.

हेह वाचा - दिल्ली हिंसाचार: मृतांचा आकडा ४२ वर, काँग्रेस प्रतिनिधींची हिंसाचारग्रस्त भागाला भेट

Last Updated : Feb 29, 2020, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.