औरंगाबाद - सर्वांचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुभवी असलेले शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. मात्र, बागडे यांचे पॅनल विजयी झाले आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
हेही वाचा- अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
दानवे आणि चव्हाण पहिल्यांदाच विजयी
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यावर भाजपशी हात मिळवणी करत पॅनल उभे केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बँक निवडणुकीत राजकीय आरोप - प्रत्यारोपांनी राजकारण चांगलेच तापले असताना निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनुभवी असलेल्या हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला असला तरी पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. त्यामुळे अंबादास दानवे पुन्हा वरचढ ठरल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा- अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी