मुंबई - पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बंडखोर गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या गटाने बाजी मारली. सातपैकी सहा जागांवर विजय मिळवला. भुमरे यांचा यानंतर आत्मविश्वास दुणावला असून आगामी महापालिका नगरपालिकांमध्ये ( Upcoming municipal elections ) शिंदे गट बाजी मारेल, असा दावा केला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या निवडणुका झाल्या.
शिंदे गटाला दणदणीत यश - या निवडणुकीत शिंदे गटाला दणदणीत यश मिळाला आहे. यानंतर होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गट बाजी मारेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. शिंदे यांची काम करण्याची पद्धत आणि त्याने दिलेला शब्द ते पाळतात, अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीत सर्व संस्थांवर शिंदे गटाचा, शिवसेनेचा झेंडा फडकल्याशी राहणार नाही, असे माजी मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. पैठणमधील दौऱ्यावरून ही भुमरे यांनी आदित्य ठाकरे ( Bhumre criticism of Aditya Thackeray ) यांना लक्ष्य केले. मतदारसंघात लोक आदित्यला ठाकरे यांना बघायला आली होती. मतदान मात्र शिंदे गटाला केला आहे. त्यामुळे कोणी आव्हान देऊ नये, असा इशारा भुमरे यांनी आदित्य ठाकरेंना दिला.
हेही वाचा - Bhujbal Letter To CM : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ठाकरे गटाला शिंदे गटाने धूळ चारली - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर युवा सेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पैठणमध्ये शिवसंवाद यात्रा काढली. बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन गद्दारांनो हिम्मत असेल तर राजीनामे द्या आणि पुन्हा येऊन दाखवा, असा आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंच्या यात्रेला यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र नुकत्याच झालेल्या पैठण जिल्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाने धूळधाण चारली आहे. संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील सात पैकी सहा जागांवर दणदणीत विजय मिळाला आहे. तर एक जागा राष्ट्रवादीकडे गेली आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : 'बाळासाहेबांनी शिकवलं रडायचं नाही, सत्यासाठी...'; संजय राऊतांचे विरोधकांना पत्र