ETV Bharat / state

Dahihandi In Aurangabad औरंगाबादेत गोविंदा पथक उत्साहात, दोन वर्षांनी होणाऱ्या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष

गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडी Dahihandi सोहळ्यात गोविंदा पथक Govinda team कसून सराव करत आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात सोहळा पार पडणार असून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात दहीहंडी फुटेल असा विश्वास आयोजकांनी केला आहे Dahihandi celebration in Aurangabad . दुपारी या दहीहंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमान क्रीडा मंडळाचे Swabhiman Sports Board अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी दिली आहे.

Dahihandi In Aurangabad
Dahihandi In Aurangabad
author img

By

Published : Aug 18, 2022, 11:23 AM IST

औरंगाबाद कोरोना काळाच्या दोन वर्षांमध्ये अनेक सण सोहळे साजरे करण्यात निर्बंध होते. मात्र आता परिस्थिती आटोक्यात आल्याने पुन्हा एकदा उत्साहाने सोहळे साजरे केले जात आहेत. गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडी Dahihandi सोहळ्यात गोविंदा पथक Govinda team कसून सराव करत आहेत तर यंदा मोठ्या प्रमाणात सोहळा पार पडणार असून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात दहीहंडी फुटेल असा विश्वास आयोजकांनी केला आहे Dahihandi celebration in Aurangabad .

स्वाभिमान क्रीडा मंडळ

स्वाभिमान क्रीडा मंडळ येथे आगळेवेगळा सोहळा शहरातील सिडको Aurangabad Cidco भागात असणारी स्वाभिमान क्रीडा मंडळाची दहीहंडी नेहमीच विशेष असते. अनेक ठिकाणी सिने अभिनेते किंवा सेलिब्रिटी यांना निमंत्रित करून सोहळा साजरा केला जातो. मात्र गोविंदा हाच सोहळ्याचा मुख्य सेलिब्रिटी असे समजून कॅनॉट भागात सोहळा साजरा केला जातो. साहसी क्रीडा प्रकार असलेल्या प्रकाराला महत्व प्राप्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता कोणतेही सेलेब्रिटी बोलवत नाहीत. शहरात सर्वात पहिले सुरू होणारी दहीहंडी म्हणून स्वाभिमान क्रीडा मंडळाची असे दहीहंडीकडे पाहिले जाते. सायंकाळी सहानंतर शहरात दहीहंडी फोडण्याच्या सोहळ्याला सुरुवात होते. मात्र गोविंदा पथकांची सुरक्षा आणि नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता यावा याकरिता, दुपारी या दहीहंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात येते अशी माहिती स्वाभिमान क्रीडा मंडळाचे Swabhiman Sports Board अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी दिली आहे.

शहरात लागतात सात थर महाराष्ट्र शासनाने दहीहंडीच्या दिवशी सुट्टी जाहीर केल्याने नागरिक आणि दहीहंडी पथक यांच्यात उत्साह निर्माण झाला असे मत दहीहंडी आयोजकांनी व्यक्त केले आहे. शहरात अनेक गोविंदा पथक आहेत जे दहीहंडी फोडण्यासाठी आपली कला सादर करत असतात. शहरांमध्ये सात ते आठ थरांपर्यंत मनोरा उभा केला जातो. दोन वर्षे सोहळा होऊ न शकल्याने पथकांनी तयारी केली नव्हती. मात्र पुन्हा एकदा सण साजरा करण्यात निर्बंध नसल्याने काही महिन्यांपासून गिविंदा पथक सज्ज झाले असून कसून सराव केला जात आहे. त्याच बरोबर सरकारने विमा काढण्याची घोषणा केल्याने पथकातील गोविंदानी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे.

गोविंदा पथकांसाठी बक्षीसंची लायलूट दोन वर्षांनी होणाऱ्या सोहळ्याकडे सर्वच गोविंदा पथकांचे लक्ष लागले आहे. राजकीय मंडळींकडून करण्यात येणाऱ्या आयोजनात मोठ्या प्रमाणात बक्षिसांची लायलूटही केली जाते. त्यांच्या प्रसिद्धीसाठी मोठे मोठे बक्षीस देण्यात येत असले तरी यामुळे पथकांना प्रेरणा मिळत असते. दोन वर्षांनी पुन्हा एकदा सोहळा होणार असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दहीहंडी कोणते पथक फोडते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा Guruvar Vrat Vidhi गुरुवारच्या व्रतामुळे घरात सुख समृद्धी येईल, जाणून घ्या त्याची पूजा पद्धत आणि उपाय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.