ETV Bharat / state

Gopichand Padalkar On Ajit Pawar इंदिरा गांधी निवडणुकीत हरल्या, अजित पवार काय चिज आहेत: गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल - इंदिरा गांधीचा पराभव झाला

बारामतीत जाऊन गोपीचंद पडळकर हे पवार कुटूंबावर नेहमीच टीका करतात. आजही औरंगाबादेत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर ( Gopichand Padalkar Attack On Ajit Pawar ) चांगलीच सडकून टीका केली. इंदिरा गांधींचा पराभव ( Indira Gandhi defeated ) झाला, तर अजित पवार किस झाड की पत्ती है, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला. पवारांना मी बारामतीत जाऊन उत्तर देईल, असेही ते यावेळी म्हणाले. बारामतीतील 42 गावांना पिण्याचे पाणी ( Baramati Drought Issue) मिळत नाही, हे पवारांचे अपयश असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Gopichand Padalkar On Ajit Pawar
भाजप आमदार गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Jan 10, 2023, 7:03 PM IST

औरंगाबाद - बारामतीतील 42 गावातील नागरिकांना आजही पिण्यासाठी पाणी ( Baramati Drought Issue) मिळत नाही, हे पवार कुटूंबियांचे अपयश असल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar Attack On Ajit Pawar ) यांनी केली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबाला मी पुरून उरलो, पवार कुटुंबाला सळो की पळो करून सोडले, त्यामुळे ते बावचळल्या सारखे करत आहेत. बारामतीला जाऊन पवार यांना मी उत्तर देईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. इंदिरा गांधीचा पराभव झाला ( Indira Gandhi defeated ) , अजित पवार किस झाड की पत्ती है, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. मी माझी भूमिका मांडून त्यांचा चेहरा उघड करण्याचा प्रयत्न करणार आहे. अडीच वर्षात राष्ट्रवादीने माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, अशी टीका देखील पडळकर यांनी केली.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर

बारामती आसपासच्या गावांना पाणी नाही बारामतीने यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदे दिली. मात्र यांनी बारामतीला काय दिले? हा प्रश्न आहे. बाहेरून कोणी आल्यावर बारामतीतील फक्त चांगल्या गोष्टी हे त्यांना दाखवतात. मात्र दुसरी बाजू ही कधीही दाखवत नाहीत. यांच्या मतदारसंघात अनेक गावांना पाण्याची समस्या आजही भेडसावत आहे. त्यांना हे पाणी देखील देऊ शकले नाहीत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. तर शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले असेल ती व्यवस्थित व्हावे, देवाकडे शरद पवार यांचे दीर्घ आयुष्य असावे, शरद पवार यांना 100 वर्ष आयुष्य लाभो, अशी मनोकामना देखील गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली.

ओबीसी समाजाला न्याय का नाही भुजबळ यांनी ओबीसी जनगणनेची मागणी केली, मात्र ही त्यांची दुटप्पी भूमिका झाली. राज्यात त्यांची सत्ता असताना ते करू शकत होते. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. मी ही मागणी मागे केली आहे, आता ही करेल. मुख्यमंत्री यांची भेट घेईल आणि ओबीसी विषयावर चर्चा करेल. मात्र धनगर समाजाला न्याय न देण्याची पवारांची भूमिका असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. ओबीसी शिवाय नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला. इम्पेरियल डेटा मिळत नाही, अशी ओरड यांनी केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर एक महिन्यात निर्णय घेऊ असे सांगितले. प्रत्यक्षात पंधरा दिवसातच निर्णय घेऊन दाखवला. केंद्राकडून इम्पेरियल डाटा आला नाही, तरी त्यांनी ते करून दाखवले, असेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.