ETV Bharat / state

आजोबांच्या मृत्यूनंतर नातीची आत्महत्या; गळफास घेऊन आयुष्य संपवले

आजोबांच्या निधनाचे दुःख अनावर झाल्याने नातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडली आहे.

author img

By

Published : Jul 25, 2019, 7:09 PM IST

औरंगाबाद - आजोबांच्या निधनाचे दुःख अनावर झाल्याने नातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडली.

पूजा किशोर वाहुळे असे नातीचे नाव असून, ती हर्षी येथील रहिवासी आहे. सध्या ती गुजरातमधील सुरतमध्ये राहात होती. तसेच संबंधित स्त्री ही २४ वर्षीय विवाहिता होती. आजोबांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाल्याने दशक्रिया विधीसाठी पूजा माहेरी हर्षी येथे पती व मुलांसह आली होती.

रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले. हवेत गरमी असल्याने सर्व कुटुंबीय बाहेरच झोपले होते. घरात एकट्याच झोपलेल्या पुजाला सकाळी जागे करण्यासाठी गेल्यावर तिने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेमुळे वाहुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूजाच्या जन्मापासून आजोबांनीच तिचा सांभाळ केला होता. लहानपणापासून आजोबांची लाडकी असल्याने त्यांच्या निधनाने पुजाला खूप दुःख झाले होते. आजोबांच्या निधनाचे दुःख अनावर झाल्याने मानसिक स्थिती बिघडून तिने ही टोकाची भूमिका घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे.

आजोबांच्या निधनाचे दुःख अनावर झाल्याने नातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडली आहे.

या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूजाच्या पश्‍चात तिचे पती, दोन लहान मुलगे असा परिवार आहे. तिच्या आकस्मात मृत्यूने हर्षी-खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.

Intro:आजोबाच्या निधनाचे दुःख अनावर झाल्याने एका नातीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या हर्षी येथे घडलीय. Body:पूजा किशोर वाहुळे असं त्या नातीचं नाव आहे. ती २४ वर्षीय विवाहिता होती. आजोबांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. मृत पूजा ही सध्या सूरतमध्ये राहत होती. आजोबाच्या दशक्रिया विधीसाठी पूजा माहेरी हर्षी येथे पती, मुलांसह आली होती. Conclusion:रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते. उकाडा जाणवत असल्याने सर्व कुटुंब व नातेवाईक बाहेरच झोपी गेले व ती एकटीच घरात झोपली होती. सकाळी तिला जागे करण्यासाठी गेल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत ती दिसली. या घटनेमुळे वाहुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूजा आजोबाची फारच लाडकी होती. तिचा लहानपणापासून आजोबाच सांभाळ करत होते. आजोबांची अत्यंत लाडकी असलेल्या पूजाला आजोबाचे निधन झाल्याने तिला खूप दुःख झाले होते. आजोबाचे दुःख अनावर झाल्याने तिची मानसिक स्थिती बिघडली म्हणून तिने टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पूजाच्या पश्‍चात पती, एक चार व अडीच वर्षांचा मुलगा आहे. तिच्या मृत्यूने हर्षी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.