औरंगाबाद - कन्नड तालुका हा विविधांगी निसर्गाने नटलेला आहे. या तालुक्यात विविध ऐतिहासिक स्थळे आहेत. गौताळा अभयारण्य विविध जाती प्रजातींची वनस्पती फुले, औषधी वनस्पती रानवेली यासह विविध जाती प्रजातींचे पशु पक्षी आणि प्राणी यासाठी प्रसिद्ध आहे. कन्नड तालुक्यामधे गावरान आंब्याची जास्त लागवड असते. मात्र, यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे गावरान आंब्याची 50 टक्क्यांनी घट झाली आहे.
औरंगाबादपासून 60 किमी अंतरावर हा तालुका असून, चाळीसगावपासून 30 कमी अंतरावर आहे. कन्नड तालुक्यात निसर्गरम्य गौताळा अभ्यारण्य, जगप्रसिद्ध असलेली पितळखोरा लेणी आहेत. गणपती उत्सवात गुलालाऐवजी फुलाची उधळण करणारा हा तालुका आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. सर्व ऋतूतील फळ पिके येथील शेतकरी आपल्या शेतात पिकवतो. कन्नड तालुक्यामधे गावरान आंब्याची जास्त लागवड असते. यासाठी वासडी, मेहगाव, निभोरा, ब्राम्हणी गराड़ा, चिकलठान आदी गावे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहेत. जसा जसा आंब्याचा गोडवा संपत आहे, तसा गावरान आंब्याचा लोणच्याची चाहूल कन्नडच्या नागरिकांना लागली आहे.
जंगलातील काळी मैना म्हणून प्रसिद्ध असलेले करवंदे, चारोळीसुद्धा विक्रीसाठी दाखल झाली आहे. लोणच्याच्या गावरान आंब्याचा भाव 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तालुक्यात पिशोर परिसरात चिकू अधिक प्रमाणात घेतले जातात. मराठवाड्यात सर्वाधिक चिकू उत्पादित करणारा हा तालुका आहे. यावर्षी पावसला चांगली सुरुवात झाली. परंतु, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे फूल गळून फळाचा बहर कमी झाला. यामुळे 50 टक्के गावरान आंब्याचे फळ कमी झाले. यामुळे लोणच्याची गावरान कैरी ही 60 ते 80 रुपये दराने विक्री होत आहे. तर पिकलेले आंबे 100 ते 150 रुपये किलोपर्यंत विक्री होत आहे.
कन्नड़ शहरातील पिशोर नाका येथे सर्व भागातील गावराण कच्ची कैरीच्या विक्रीसाठी शेतकरी येत असतो. कन्नड़ शहरातील नागरिक हे सकाळी रांग लावून आंबे घेत आहेत. कैरी फोडून देण्याची सुवुधाही शेतकऱ्याने इथे करुण दिली आहे. 10 रुपये किलो प्रमाणे कैऱ्या फोडून दिल्या जात आहेत.