ETV Bharat / state

लहान मुलाच्या हातात एसटी बसचे स्टिअरिंग देणारा तो एसटी चालक निलंबित - लहान मुलाच्या हातात चालत्या बसचे स्टेअरिंग

चालत्या बसचे स्टेअरिंग लहान मुलाच्या हातात दिल्याने बसमधील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. त्या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या प्रकरणाची शहानिशा केली असता, तो चालक गंगापूर डेपोचा कर्माचारी असल्याचे समोर आले. याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत एसटी महामंडळाच्या प्रशासनाने कारवाई केली आहे.

एसटी चालक निलंबित
एसटी चालक निलंबित
author img

By

Published : Sep 15, 2021, 12:12 PM IST

Updated : Sep 15, 2021, 1:58 PM IST

गंगापूर(औरंगाबाद) - गंगापूर एसटी आगारातील एका चालकाने धावत्या एसटीचे स्टिअरिंग लहान मुलाच्या हातात दिल्याचा प्रकार समोर आला होता. हा प्रकार चालकाला महागात पडला असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्या चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. आर. बी. शेवाळकर असे त्या चालकाचे नाव आहे. एसटी महामंडळाचे वरिष्ठ सहाय्यक आधिकारी अ.व. आहिरे यांनी या कारवाईची माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता असा प्रकार कोणत्याही चालकाने करू नये अशी सूचना देखील अहिरे यांनी यावेळी केली.

मुलाच्या हातात एसटी बसचे स्टिअरिंग देणारा तो एसटी चालक निलंबित
गंगापूर-उदगीर बसच्या चालकाने बसमधील एका लहान मुलाच्या हातात चालत्या बसचे स्टिअरिंग दिल्याचा व्हिडिओ समोर आला होता. चालत्या बसचे स्टिअरिंग लहान मुलाच्या हातात दिल्याने बसमधील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. त्या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या प्रकरणाची शहानिशा केली असता, तो चालक गंगापूर डेपोचा कर्माचारी असल्याचे समोर आले. याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत एसटी महामंडळाच्या प्रशासनाने कारवाई केली आहे.

उदगीरला चालली होती बस-

12 सप्टेंबर रोजी बस क्रमांक (एमएच 13 सीयु 8110) या बसचे चालक आर. बी. शेवाळकर हे गंगापूर डेपोची बस घेऊन उदगीरला जात होते. त्यावेळी त्यांनी बसमधील एका लहान मुलाला जवळ बसवून घेतले आणि त्यानंतर चालत्या बसचे स्टेअरिंग त्या लहान मुलाच्या हातात दिले. या घटनेचा व्हिडिओ प्रवाशांनी रेकॉर्डे केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. लहान मुलाच्या हातात स्टिअरिंग दिल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. याची दखल घेत वरिष्ठ सहाय्यक आधिकारी अ.व. आहिरे यांनी चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

मुलगा रडत असल्याने जवळ बसवल्याचा चालकाचा खुलासा-

गंगापूर आगाराच्या वतीने चालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यानुसार चालक शेवाळकर यांनी तो मुलगा नातेवाईक नसुन त्याचे रडणे थांबवण्यासाठी काही काळ आपल्या जवळ बसवल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा - वेडसर माणसाने कंटेनरला मारला दगड, ब्रेक दाबताच पाठीमागे असलेल्या एसटीने दिली जोरदार धडक; चालक गंभीर

हेही वाचा - मुंबई-नाशिक महामार्गावर धावत्या एसटी बसची चाके निखळली; ५७ प्रवासी बचावले

Last Updated : Sep 15, 2021, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.