ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

औरंगाबादमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पुंडलीकनगर पोलिसांनी ही कारवाई करत तीन आरोपींना गजाआड केले. आरोपींमध्ये एका परप्रांतीयाचा समावेश आहे.

जप्त करण्यात आलेल्या नोटा
author img

By

Published : Nov 1, 2019, 7:43 PM IST

औरंगाबाद - कलर प्रिंटरच्या मदतीने 100 रुपयांच्या बनावट नोटा तयार करून रिक्षा चालकांच्या मदतीने त्या बाजारात पसरवणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. पुंडलीकनगर पोलिसांनी ही कारवाई करत तीन आरोपींना गजाआड केले. आरोपींमध्ये एका परप्रांतीयाचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुंडलीकनगर पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला

शेख सलमान उर्फ लक्की रशीद शेख (रा.जसवंतपुरा, नेहरूनगर), सय्यद सैफ सय्यद असद (रा.नेहरूनगर, कटकट गेट), सय्यद सलीम सय्यद मोहम्मद यार (रा. कृष्णनगर, रांजणगाव शेनपुंजी, मूळ आजमगड, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी सलमान उर्फ लक्की हा त्याच्या घरात एका कलर प्रिंटरच्या सहाय्याने खऱ्या नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करत होता. त्या बनावट नोटा तो तीस टक्केच्या भावाने रिक्षा चालक सैफला द्यायचा. सैफ हे पैसे अर्ध्या किमतीत म्हणजेच 10 हजाराची बनावट नोट पाच हजारात रिक्षा चालकांना द्यायचा. मागील अनेक महिन्यांपासून या टोळीचा हा गोरखधंदा शहरात व परिसरात सुरू होता.

हेही वाचा - 'भाजपला सरकार स्थापन करता आले नाही तर, पर्यायी सरकार स्थापन करू'

बनावट नोटांची विक्री होणार असल्याची माहिती गुप्त माहितीदाराने पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या घनश्याम सोनवणे यांना दिली. त्या माहितीवरून पुंडलीकनगर पोलिसांनी जागृती पेट्रोल पंपामागील मनपाच्या उद्यानात सापळा रचला. तेथे सैफ बनावट नोटा घेऊन आला तर ते पैसे कमी किमतीत घेण्यासाठी सलीम आला. याच दरम्यान पोलिसांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - तिकीट वाटपात पैसे घेतले'; इम्तियाज जलील यांच्यावर पक्षातील माजी पदाधिकाऱ्याचा आरोप

चौकशीदरम्यान त्यांनी बनावट नोटा तयार करणारा म्होरक्या जसवंतपुरा भागात राहत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी जसवंतपुरा येथील एका घरातून सलमानला अटक केली. त्याच्या घरातून कलर प्रिंटर, कटर, स्केल पट्टी असे बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले. 10 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह (एम. एच. 20 डी. एच. 8322) दुचाकी असा 86 हजार 200 रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही या टोळीचा संबध आंतरराज्यीय टोळीशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Intro:कलर प्रिंटर च्या मदतीने घरात हेबहुब दिसणाऱ्या 100 रुपयांच्या नोटा तयार करून रिक्षा चालकांच्या मदतीने त्या बाजारात पासरविणाऱ्या टोळीचा पुंडलीकनगर पोलिसांनी भांडाफोड केला असून तीन आरोपिना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीमध्ये एका परप्रांतीयचा समावेश आहे.त्यांच्या ताब्यातून 90 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे मोठे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.Body:शेख सलमान उर्फ लक्की रशीद शेख (रा.जसवंतपुरा, नेहरुंनगर), सय्यद सैफ सय्यद असद वय-24 (नेहरुंनगर, कटकट गेट), सय्यद सलीम साय्यद मोहम्मद यार वय-22 वर्षे (रा.हमू, कृष्णनगर, रांजणगाव शेनपुंजी, मूळ अजमगड,उत्तरं प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.Conclusion:आरोपी समराण उर्फ लक्की हा त्याच्या घरात एका कलर प्रिंटरच्या साहाय्याने हुबेहूब खऱ्या नोटा सारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करीत असे त्या बनावट नोटा तो तीस टक्केच्या भावाने रिक्षा चालक सैफ ला द्यायचा व सैफ हा ते पैशे अर्ध्या किमतीत म्हंजेज 10 हजाराची बनावट नोटा तो पाच हजारात रिक्षा चालकांना द्यायचा. मागील अनेक महिन्यापासून या टोळीचा हा गोरखधंदा शहरात व परिसरात सुरू होता.या बाबत गुप्त माहितीदाराने बनावट नोटांची विक्री होणार असल्याची माहिती घनश्याम सोनवणे यांना दिली होती त्या माहिती वरून पुंडलीकनगर पोलिसांनी सेव्हनहिल जवळील जागृती पेट्रोलपम्पा मागील मनपाच्या उद्यानात सापळा रचला व तेथे सय्यद सैफ हा बनावट नोटा घेऊन आला तर ते पैशे कमी किमतीत घेण्यासाठी तेथे सलीम आला दरम्यान पोलिसांनी धाड टाकत दोघांना ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या म्होरक्या जसवंत पुरा भागात राहत असल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी तेथून समराण ला घरातून अटक करीत त्याच्या घरातून प्रिंटर, कलर, कटर,स्केल पट्टी असे बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले व 10 हजार रुपयांच्या बनावट नोटा, सह( एम एच 20 डी एच 8322) दुचाकी असा 86 हजार 200 रूपयाचा एकूण मुद्देमाल तिन्ही आरोपी कडून जप्त करण्यात आला आहे .या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही अंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
-------------------

रांजणगावात किरकोळ विक्रेत्याना चालविल्या बनावट नोटा.

या पूर्वी अशा हजारोच्या बनावट नोटा रांजणगाव व औधोगिक नगरीत आरोपिनि किरकोळ विक्रेत्यांना चालविल्या आहेत. त्याच बरोबर शहरातील रिक्षाचलकानाही खपविल्याचे समोर आले आहे.त्यामुळे शहरांत मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.