ETV Bharat / state

Ganesh festival In Africa : सातासमुद्रापार बाप्पाचा जयजयकार! आफ्रिका खंडातील 'या' देशात मराठी लोकांकडून गणेशाची स्थापना - Ganesh festival 2023

Ganesh festival In Africa : गणेशोत्सवाची धूम फक्त महाराष्ट्रात नाही, तर परदेशातही पाहायला मिळतेय. चक्क सातासमुद्रापार गणपती बाप्पाचा जयजयकार केला जातोय. आफ्रिका खंडातील मलावी देशात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली गेलीय. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या. (Prana Pratishta Shri Ganesha in Malawi)

Ganesh festival In Africa
आफ्रिकेत गणेशोत्सव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 5:27 PM IST

Updated : Sep 25, 2023, 7:01 PM IST

आफ्रिकेतही गणेश बाप्पा मोरया

छत्रपती संभाजीनगर Ganesh festival In Africa : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात जेवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, तेवढ्याच उत्साहात परदेशातही साजरा होऊ लागलाय. अशाच गणशोत्सवाच्या आठवणी आफ्रिका खंडातील मालवी देशात कामानिमित्त गेलेल्या भारतीयांनी सांगितल्या आहेत. भारतीय संस्कृती, सण, उत्सव परंपरेसाठी जगात ओळखली जाते. पारंपरिक पद्धतीनं साजरे केले जाणारे सण, उत्सव आता परदेशातही साजरे केले जात आहेत. देश-परदेशात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झालाय. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही भाविक मोठ्या उत्साहानं गणेशोत्सव साजरा करत आहेत. श्रद्धा असेल तेव्हा भाषा, प्रांत, धर्म अशा सार्‍या रेषा पुसट होतात आणि माणुसकीनं सारे एकत्र येतात. आफ्रिका खंडात मालवी देशात सातासमुद्रापार गेलेले मराठी बांधव गणेशाची स्थापना करत गणेशोत्सव साजरा करत आहेत. (Prana Pratishta Shri Ganesha in Malawi)

आठ वर्षापासून मालवी देशात गणेशाची स्थापना : गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर साखर कारखाना येथील कामगार हे गेली आठ वर्षापासून दक्षिण आफ्रिका खंडातील मालवी देशातील सलीमा शुगर येथे काम करतात. कामगारांनी यावर्षी सुद्धा गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना केलीय. आफ्रिकेत मराठी माणसे एकत्र येत फक्त गणेशोत्सव नाही, तर नवरात्र, दसरा, दिवाळी सणही एकत्र साजरे करतात. सातासमुद्रापार संस्कृती व परंपरा जपणाऱ्या मराठी बांधवांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. संस्कृतीचं आणि संस्काराचं अनमोल दर्शन आफ्रिका खंडातील मालवी देशात घडलंय. (Ganeshotsav 2023)

परदेशात गणेशोत्सव साजरा : गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर साखर कारखान्यातील कर्मचारी कामानिमित्त आफ्रिका खंडातील मालवी देशात गेले आहेत. या कामगारांनी गणरायाची स्थापना केलीय. घरापासून दूर परदेशात गणेशोत्सव फारमोठ्या प्रमाणात साजरा होत नसावा, असं काहीना वाटतं. पण, कामासाठी परदेशात गेलेले भारतीय संस्कृती जपत गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करत आहेत. त्यामुळं भारताबाहेर असूनही परकेपणा जाणवत नाही, असं आफ्रिकेतील बद्रीनाथ काकडे यांनी सांगितलंय. भारतीयांप्रमाणे इथले लोकही उत्साहानं आरतीमध्ये सहभागी होतात.

हेही वाचा :

Ganeshotsav 2023: परळचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग, पाहा व्हिडिओ

Last Updated : Sep 25, 2023, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.