ETV Bharat / state

Ganesh Festival 2023: पाच हजार वर्षांपूर्वी खाम नदीच्या तीरावर प्रकटले श्रीगणेश ; जाणून घेऊ शिंदूरात्मक गणपतीची आख्यायिका

Ganesh Festival 2023: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा असलेली अनेक पुरातन देवी, देवतांची मंदिरं आहेत. (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातून वाहत जाणारी गोदावरी नदीकाठी देवी देवतांचं वास्तव्य (Gangapur taluka) असल्याच्या अनेक आख्यायिका आपण ऐकल्या आहेत. (Shinduratmak Ganapati) आज आपण द्वापार युगातील पाच हजार वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या शिंदूरात्मक गणपतीची आख्यायिका जाणून घेणार आहोत. (Kham River)

Ganesh Festival 2023
शिंदूरात्मक गणपतीची जाणून घेऊया आख्यायिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 10:52 PM IST

शिंदूरात्मक गणपतीची आख्यायिका आणि इतर बाबी सांगताना स्थानिक भाविक

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) Ganesh Festival 2023: जिल्ह्यातील शेंदूरवादा येथे खाम नदीच्या तीरावर शिंदूरात्मक गणपती हे जागृत देवस्थान असून द्वापार युगातील पाच हजार वर्षांपूर्वीचं गणेश पुराणात उल्लेख असलेले शिंदूरात्मक गणपती देवस्थान आहे. या मंदिराची व गणपतीची खास आख्यायिका असल्यानं गणेश उत्सव, गणेश चतुर्थीला जिल्हाभरातून व जिल्ह्याबाहेरील भाविक गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. यामागील आख्यायिका आपण आजच्या या रिपोर्टमधून जाणून घेऊया.

द्वापारयुगीन मंदिराची आख्यायिका: गंगापूर तालुक्यातील जुन्या काळात शेंदूरवादा या गावाचे नाव राजसदनक्षेत्र असे होते. या भागात त्या काळी दैत्याचे राज्य होते. शेंदूरासूर नावाचा दानव या भागात राहात असे. शेंदूरासुराच्या उपद्रवाला जनता त्रासली होती. या त्रासातून सुटका व्हावी म्हणून जनतेने विघ्नविनाशक गणपतीची याचना करून प्रार्थना केली. शेंदूरासुराचा नाश करावा अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा खाम नदीच्या तीरावर श्रीगणेश प्रकटले व जनतेला त्रास देणाऱ्या शेंदूरासूर राक्षसाचा वध केला. शेंदूरासूराने गणेशाला शरण येऊन आपल्या सानिध्यात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आजही गणेशाच्या पूजेबरोबर शेंदूरासूराची पूजा करत त्यालाही नैवेद्य दाखविला जातो. गणपतीने शेंदूरासूराचा वध केला म्हणून या गावाला पूर्वी शिंदूरवध, शेंदूरवाधा, शेंदूरवाडा असेही म्हणत. तर शेंदूरासूराचा उद्धार केला म्हणून या गणपतीला शिंदुरात्मक गणपती असे म्हणतात.

राजा भोजतर्फे मंदिराचा जिर्णोद्धार: गणपतीची मूर्ती आकर्षक असून सहा ते आठ फूट उंचीची आहे. मूर्ती वाळूची असून दक्षिणमुखी आहे. श्रीगणेशाच्या चरणी भगीरथी तीर्थकुंड असून त्या तीर्थास विनायक तीर्थ असेही म्हणतात. मंदिराचा जीर्णोद्धार राजा भोज यांनी शके 1706 इसवी सन 1784 मध्ये केला असल्याचा शिलालेख मंदिरावर पाहवयास मिळतो. मंदिर अष्टकमानी असून बांधकाम पूर्णपणे दगडी आहे. 1974 मध्ये शेंदूरवादा येथे गणपती अथर्वशीर्ष मंडळ स्थापण करण्यात आले. तेव्हापासून दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला येथे सहस्र आवर्तन करतात. चतुर्थीला नेहमीच मोठी गर्दी असते. गणपती मंदिरालगतच संत कवी मध्वमुनीश्वर यांची समाधी मंदिर आहे. समाधी मंदिर असलेला वाडा तब्बल तीनशे वर्षांपूर्वीचा आहे. छत्रपती संभाजीनगर पासून शेंदूरवादा हे गाव ३५ किलोमीटर अंतरावर आहे.

पुरातन मंदिर विकासापासून वंचित: द्वापारयुगीन पाच हजार वर्षांपूर्वी शेंदूरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी खाम नदीच्या तीरावर श्रीगणेश: प्रकटले होते. असा ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिराला अनेक दशके उलटूनही पुरातन ख्याती असलेले मंदिर व परिसर विकास कामापासून वंचित आहे. मंदिर परिसरात अनेक विकास कामे होणे गरजेचे आहेत. तसेच मंदिर परिसरात असलेल्या पुरातन वस्तूंचे संवर्धन होणेही आवश्यक आहे. अनेक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ गणपतीला नारळ फोडून केला जातो. पुरातन मंदिर असूनही मंदिर परिसर विकासासाठी कोणताही भरीव निधी देण्यात आला नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

  1. Ganesh Festival 2023: दगडूशेठ गणपतीला १३१ लिटर शहाळ्याचे आईस्क्रीम प्रसाद स्वरूपात अर्पण
  2. Ganesh Festival 2023: लालबागच्या राजासमोर कोळी महिलांनी केलं नृत्य सादर, पहा व्हिडिओ
  3. Ganesh Festival 2023: पर्यावरण पूरक बाप्पा म्हणून गिरगावच्या राजाची ओळख; भाविकांची होतेय गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.