ETV Bharat / state

G20 Summit : आंतरराष्ट्रीय स्तरावर पैठणीची मागणी वाढणार!; दिल्लीत जी २० परिषदेत होणार पैठणीची ब्रँडिंग - जी २० परिषद

G 20 Summit : जी-२० परिषदेसाठी दिल्ली शहर सज्ज झालं असून सुशोभीकरणाची तयारी देखील पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य घटक असलेली पैठणी (Aurangabad Paithani) तसेच कोल्हापुरी चप्पलचंदेखील (Kolhapuri Chappal) दिल्लीत होणाऱ्या परिषदेत ब्रॅण्डिंग होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित पैठणीची मागणी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

G 20 Summit
जी २० परिषदेत होणार पैठणीची ब्रँडिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 9:02 AM IST

Updated : Sep 9, 2023, 9:59 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : G20 Summit : दिल्ली इथं जी २० अंतर्गत महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे. यात कोल्हापूरची चप्पल (Kolhapuri Chappal) आणि जिल्ह्याची जागतिक ओळख असलेली पैठणी (Aurangabad Paithani) यांचं ब्रँडिंग केली जाणार आहे. याचा थेट परिणाम सकारात्मक प्रसिद्धी आणि व्यवसायावर होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या जी २० परिषदेत देखील पैठणी मुख्य आकर्षण म्हणून ठेवण्यात आली होती. वीस देशांच्या पाहुण्यांना हिमरू शालसह पैठणीचा फेटा (Paithani Saree Pheta) घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं.

पैठणीचं महत्त्व पुरातन काळापासून : (Importance of Paithani Saree) पुरातन काळी पैठण ही महाराष्ट्राची राजधानी होती, असं मानलं जातं. पदरावर मोराची प्रामुख्याने चौकोनी वैशिष्ट्यपूर्ण नक्षी असलेली पैठणी ही शिवकालीन साडी आहे. जगप्रसिद्ध पैठणीचं महत्त्व जुन्या काळापासून मानलं जाते. पैठण तालुक्यात हातमागावर तयार झालेले वस्त्र म्हणजे पैठणी. एक वस्त्र तयार करण्यासाठी एका कारागिरीला अनेक महिने मेहनत घ्यावी लागते. धागा धागा यंत्रावर जोडून हे वस्त्र तयार केलं जाते. याला रेशमी वस्त्र म्हणून देखील ओळखलं जाते. पैठणीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नक्षीकाम हात मागावर एक एक धागा घेऊन तयार केलेलं वस्त्र असलं तरी, त्यातलं नक्षीकाम सर्वांना आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचं. पैठणी घेणं हे प्रत्येक सौभाग्यवतीचं स्वप्न असायचं. पण ते घेणं प्रत्येकाच्या आवाक्यात बसत नव्हतं. हे वस्त्र वापरणारी स्त्री म्हणजे उच्चभ्रू किंवा राजेशाही कुटुंबातील म्हणून ओळखलं जायची. काळपरत्वे या वस्त्रात अनेक बदल घडत गेले, त्यात मिनी पैठणी हा प्रकार समोर आला. त्यामुळे अनेकांच्या आवाक्यात हे वस्त्र येऊ लागलं. जगात कुठे नाही, असं महावस्त्र फक्त महाराष्ट्रातच तयार होतं. याच वस्त्राची ब्रँडिंग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाणार आहे.

शहरात देखील केलं होतं ब्रँड्रिंग : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर शहरात जी२० ची परिषद झाली. पहिल्यांदाच महिला सदस्यांची खास परिषद भरवण्यात आली होती. यावेळी वीस देशांमधून आलेल्या महिला पाहुण्यांना पैठणी फेटा घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती, तिथं स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलं होतं. त्यात पैठणीचा देखील समावेश करण्यात आला होता. पैठणी कशी तयार होते, तिचं महत्त्व काय आहे, याबाबत विदेशी पाहुण्यांना माहिती देण्यात आली होती. इतकंच नाही तर काही पाहुण्यांनी तर शहरात फिरुन स्थानिक उद्योगांची पाहणी देखील केली होती. त्यामुळे पैठणीची ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात शहरात झालेल्या जी २० पासूनच सुरुवात करण्यात आली. त्यात दिल्लीत होणाऱ्या परिषदेत देखील पैठणीची ब्रँडिंग होत असल्यानं, आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित पैठणीची मागणी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा -

  1. Daksh Boopathi interview: १२ वर्षांचा दक्ष मृदंग वाजवून जी-२० परिषदेत पाहुण्यांच करणार स्वागत, पहा विशेष मुलाखत
  2. Putin Xi Jinping Absent G 20 Summit : जी-२० परिषदेला पुतिन, शी जिनपिंग अनुपस्थित, इंडो-पॅसिफिक राजकारणावर परिणाम
  3. G 20 Summit : जी २० परिषदेसाठी राजधानी सज्ज, पहा Photos

Last Updated : Sep 9, 2023, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.