ETV Bharat / state

औरंगाबाद; आनंदपूर आणि शृंगारवाडीत चार दिवसांचे लॉकडाऊन - paithan lockdown news

संचारबंदीदरम्यान गावातील सर्व दुकाने, पिठाची गिरणी व इतर सर्व आस्थापणा दुपारी 2 नंतर पुढील 4 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खेरेदी करताना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संचारबंदी
संचारबंदी
author img

By

Published : Mar 19, 2021, 6:26 PM IST

Updated : Mar 19, 2021, 7:28 PM IST

पैठण (औरंगाबाद)- तालुक्यातील आनंदपूर श्रुंगारवाडी गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या या संख्येवर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने दुपारी दोन नंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पुढील चार दिवस हा लॉकडाऊन लागू असणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे.

आनंदपूर आणि शृंगारवाडीत चार दिवसांचे लॉकडाऊन

नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

संचारबंदीदरम्यान गावातील सर्व दुकाने, पिठाची गिरणी व इतर सर्व आस्थापणा दुपारी 2 नंतर पुढील 4 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खेरेदी करताना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जो कोणी कोरोना नियमांचे पालन करणार नाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही शेळके यांनी दिला आहे. तसेच गावकऱ्यांनी अत्यावश्यक काम वगळता घराबाहेर किवा गावाबाहेर जाऊ नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच संगीता खराद यांनी केले आहे.

हेही वाचा- कोरोना कहर.. खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सरकारचे आदेश

Last Updated : Mar 19, 2021, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.