औरंगाबाद- जिल्ह्यात रविवारी सकाळी 42 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1540 झाली आहे. जिल्ह्यात 976 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 70 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 494 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रविवारी सकाळी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भवानी नगर, जुना मोंढा (4), कैलास नगर, गल्ली नं. दोन (3), एन सहा, सिडको (3), जाफर गेट, जुना मोंढा (1), गल्ली नं.17, संजय नगर, मुकुंदवाडी (1), गल्ली नं. चार रहीम नगर, जसवंतपुरा (1), व्यंकटेश नगर, जालना रोड (1), समता नगर (1), नवीन बायजीपुरा (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (1),किराडपुरा (3), पिसादेवी रोड (1), बजाज नगर (1), देवळाई परिसर (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), हमालवाडी (1), जुना बाजार (2), भोईवाडा (1), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (2), सुराणा नगर (1), अझम कॉलनी (1), सादात नगर (1), महेमुदपुरा, हडको (1), निझामगंज कॉलनी (1), शहागंज (1), गल्ली नं. 24 संजय नगर (1), बीड बायपास रोड (1), स्वप्न नगरी (1), अन्य (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 24 महिला आणि 18 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र, शनिवारी रात्री वैजापूर शहरात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. हे रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर पूर्ण: सील करण्यात आला आहे.
घाटी रुग्णालयात औरंगाबाद शहरातील 52 वर्षीय महिला रुग्णाचा 30 मे रोजी सायं.5 वाजून 20 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 59 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर खासगी रुग्णालयात 10, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 70 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.