ETV Bharat / state

मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी, औरंगाबादमधे एकाचा मृत्यू - मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

औरंगाबादेत कोरोनामुळे 58 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून हा रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून घाटी रुग्णालयात उपचार घेत होता. या रुग्णाला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

first death of covid 19 patient
मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी, औरंगाबादमधे एकाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 5, 2020, 6:57 PM IST

औरंगाबाद - मराठवाड्यामधील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. औरंगाबादेत कोरोनामुळे 58 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवशी चार जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 7वर गेली आहे.

मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी, औरंगाबादमधे एकाचा मृत्यू

औरंगाबादेत कोरोनामुळे 58 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून हा रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून घाटी रुग्णालयात उपचार घेत होता. या रुग्णाला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा त्रास होता. दुपारी बाराच्या सुमारास मृत्यू झाल्याने औरंगाबादेत आता चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग आता हळू हळू पाय पसरत आहे. औरंगाबादेत गेल्या दोन दिवसातच रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना बधितांची संख्या 7वर गेली असून, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरंगाबादकरांमध्ये चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी सिडको आणि आरेफ कॉलनीत दोन रुग्ण आढळून आल्यानंतर दोन्ही परिसरात आरोग्य तपासणीला सुरुवात झाली आहे. या तपासणीत जवळपास तीन रुग्णांची भर पडली तर हिमायातबाग आणि सातारा परिसरातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 58 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.

लॉकडाऊन काळामध्ये मोठ्या प्रमाणात फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. औरंगाबादच्या परिस्थितीचा आढावा घेतला, आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.