ETV Bharat / state

सिल्लोडमध्ये गोळीबार, बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याच्या अपहरणाचा डाव

सिल्लोडमध्ये एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांस बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्याचा डाव होता. घटनेत शिवना येथील श्रीराम कापड दुकान कुंदनसशेठ गुप्ता यांचे धाकटे बंधू अखिलेश सुधीरसेठ गुप्ता हे बालबाल बचावले.

औरंगाबाद
औरंगाबाद
author img

By

Published : Nov 9, 2020, 10:22 AM IST

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्यास बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्याचा डाव होता. ही घटना खुपटा गावास जोडणाऱ्या पाणंद रस्त्यावरील शेतात रविवार रात्री घडली. दोनवेळेस हवेत व एकदा अंगावर गोळी झाडण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. या घटनेत शिवना येथील श्रीराम कापड दुकान कुंदनसशेठ गुप्ता यांचे धाकटे बंधू अखिलेश सुधीरसेठ गुप्ता हे बालबाल बचावले.

गुप्ता नेहमीप्रमाणे शेतीकामे आटोपून मजूर घेऊन घराकडे निघाले. दरोडेखोरांनी पाच ते सहा मजुरांना बाजूला सारून अखिलेश यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अखिलेश यांनी प्रसंगावधान राखत अपहरणकर्त्यांचा प्रतिकार करत पळ काढला. त्यावेळी अपहरणकर्त्यांतील एकाने "पंकज तू घाबरू नको" याला गोळी घाल म्हणत, अखिलेश यांच्यावर बंदूक ताणली.

व्यापाऱ्यावर गोळीबार -

पहिल्यांदा दोन वेळेस हवेत गोळीबार व दुसऱ्यांदा थेट निशाणा साधत गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते बालबाल बचावले. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार निलेश सिरसकर यांनी पंचनामा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.