ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये दोन गोदांमाना आग; लाखो रुपयांचे नुकसान

author img

By

Published : Apr 23, 2020, 7:26 PM IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत दोन गोदामांना भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. आज (गुरूवारी) दुपारी दोनच्या ही आग लागली. क्षणात आगीने उग्ररुप धारण केले. बाजूला असलेल्या दुसऱ्या गोदामला देखील आगीने व्यापले.

औरंगाबादमध्ये दोन गोदांमाना आग
औरंगाबादमध्ये दोन गोदांमाना आग

औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत दोन गोदामांना भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. आज (गुरूवारी) दुपारी दोनच्या ही आग लागली. क्षणात आगीने उग्ररुप धारण केले. बाजूला असलेल्या दुसऱ्या गोदामला देखील आगीने व्यापले. स्थानिकांनी अग्निशामक दलाच्या जवानांना याबाबत माहिती दिली. काही वेळात अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. जवळपास एक तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीत मोठ्या प्रमाणात प्लस्टिक, लाकूड, पुठ्ठे असल्याने आग विझवण्यास वेळ लागला. प्लस्टिकमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ अवकाशात दिसत होते. मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात भंगार आणि कचरा असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी आपल्या परीने प्रयत्न करायला सुरुवात केली. मात्र, आग आटोक्यात येत असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास एक तासानंतर आग नियंत्रणात आली. तर आग कशामुळे लागली? हे अद्याप अस्पष्ट आहे. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - 9 महिन्याच्या बाळाचे कोरोनाशी दोन हात; सहा दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.