ETV Bharat / state

मुलानेच केली जन्मदात्या बापाची हत्या.. घरातच खड्डा काढून पुरला मृतदेह - मुलाने केला बापाचा खून

वडिलांकडून नियमित होणारी मारहाण व इतर त्रासामुळे त्रस्त झालेल्या मुलाने बापाचा खून केल्याची घटना उघडकीस झाली आहे.

father murder
नियमित होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलाने केला बापाचा खून
author img

By

Published : Feb 29, 2020, 7:27 PM IST

Updated : Feb 29, 2020, 8:34 PM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट येथे वडिलांकडून नियमित होणारी मारहाण व इतर त्रासामुळे त्रस्त झालेल्या मुलाने बापाचा खून करुन त्यांना घरातच खड्डा खोदून पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. कन्नड ग्रामीण पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

तालुक्यातील जामडी फारेस्ट येथील नामदेव पोमा चव्हाण हे आपल्या पत्नी व मुला बाळा सह राहत होते. डिसेंबर महिन्यात मृत चव्हाण यांचा मुलगा रितेश नामदेव चव्हाण याच्यासोबत भांडण झाले होते. हाच राग मनात धरुन वडिलांना डोक्यात काठी मारुन जखमी केले व जिव जात नसल्याने फाशी दिली. हे कोणाला कळू नये म्हणून आरोपी मुलाने वडिलांचा मृतदेह घरातच दोन फुटाचा खड्डा खोदून पुरला.

आपला पती घरातून बेपत्ता असल्याचे ललिताबाई नामदेव चव्हाण यांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आज (29 फेब्रुवारी) मृताचे भाऊ पुतण्या रितेशल वडील कोठे आहेत? असे विचारले असता त्यांने कोणालाही सांगू नका या अटीवर सर्व माहिती त्यांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यानी सरकारी पंच म्हणून नायब तहसीलदार हारुण शेख, ग्रामसेवक, एसटी महामंडळचा कर्मचारी या 3 सरकारी पंचासमक्ष रोजनदारी मंजुराचा सहाय्याने खोद काम करुन दोन फुट खोल खड्ड्यात गाडलेल्या मृतदेह बाहेर काढला.

हेही वाचा - मुंबईतही होऊ शकतो हिंसाचार, जमावबंदीचे आदेश जारी

Last Updated : Feb 29, 2020, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.