ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत; कन्नडमधील कोट्यवधींचा शेतीमाल बांधावर पडून - आधुनिक शेती

कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस लॉकडाऊनमुळे तसाच पडून आहे. तर कमी पाण्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरून टरबुज (कलिंगड) टोमॅटो, कोबी, कांदा, अद्रक, हा शेतीमालही कवडीमोल झाला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

Farmers
शेतकरी
author img

By

Published : Apr 17, 2020, 3:10 PM IST

औरंगाबाद (कन्नड) - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून याची सर्वाधिक झळ शेती व्यवसायला बसली आहे. कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस लॉकडाऊनमुळे तसाच पडून आहे. तर कमी पाण्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरून टरबुज (कलिंगड) टोमॅटो, कोबी, कांदा, अद्रक, हा शेतीमालही कवडीमोल झाला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

कन्नडमधील कोट्यवधींचा शेतीमाल बांधावर पडून

तालुक्यातील हतनुर परिसरात पारंपरिक शेतीला फाटा देवून कमी पाण्यात आधुनिक पध्दतीचा अवलंब करून अद्रक, टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, बटाटा या पिकांचे विक्रमी उत्पन्न घेणारे कृषिभूषण शेतकरी संतोष जाधव यांच्या शेती व्यवसायला मोठा फटका बसला आहे. जाधव यांनी आपल्या १० एकर क्षेत्रात टोमॅटो तर १० एकरमध्ये टरबुज (कलिंगड) पिकाची लागवड केली होती. यासाठी आठ ते दहा लाखांचा खर्च आला,असून टोमॅटो व टरबुज तोडणीच्या काळात देशात लॉकडाऊन सुरू झाल्याने शेतातील हा माल तोडून बांधावर फेकून देण्यात आला.

औराळा येथील सुभाष जिवरख आणि अण्णासाहेब जिवरख या दोघांनी मिळून ७० गुंठे शिमला मिरची, कविटखेडा येथील पंढरीनाथ गव्हाणे, जवळी खुर्द येथील बबनराव खेळवणे यांनी प्रत्येकी दिड एकर टरबुजाचे पीक शेतात घेतले. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे वाहतूक, मोठ्या बाजारपेठा बंद असल्याने माल शेतातच पडून आहे.

काही शेतकरी तीस-चाळीस रुपये या होलसेल दराने विकली जाणारी शिमला मिरची पाच-सहा रुपये किलो या कवडीमोल भावाने विकत आहेत. अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.