ETV Bharat / state

गॅस लीक झाल्याने भाजलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

घरातील गॅस सुरू करत असताना अचानक गॅस लीक होऊन स्फोट झाल्याने भाजलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश मुळीक असे मृताचे नाव आहे.

author img

By

Published : Jan 6, 2021, 5:16 PM IST

प्रकाश दिनकर मुळीक
प्रकाश दिनकर मुळीक

औरंगाबाद - घरातील गॅस सुरू करत असताना अचानक गॅस लीक होऊन स्फोट झाल्याने भाजलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घरातील गॅस पेटवत असताना गॅस लीक झाल्याने 65 टक्के भाजले गेले. दरम्यान त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश मुळीक असे मृताचे नाव असून प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बेलेवडी (ता. पाटोदा जि.बीड) येथील शेतकरी प्रकाश दिनकर मुळीक (वय 28) हे बुधवारी (ता.पाच) आठ वाजेच्या दरम्यान गॅस शिलगावत असताना गॅस लीक झाला. दरम्यान स्फोट झाल्याने त्यात ते ६५ टक्के भाजले गेले. त्यांना तत्काळ औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान मंगळवारी रात्री त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.