ETV Bharat / state

धक्कादायक! दंडाची पावती देताच माजी सैनिकाने घेतला पोलिसांना चावा

author img

By

Published : May 28, 2021, 6:07 PM IST

Updated : May 28, 2021, 7:19 PM IST

बनसोड यांना शिवीगाळ करुन त्यांनी हातातील ई-चालान मशीन घेत खाली पाडले. यावेळी समजावून सांगत असताना सानप यांनी दुचाकीवरील हेल्मेट काढून बनसोड यांच्या हातावर मारले. त्यांना बनसोड यांनी अडविण्याचा बराच प्रयत्न केला. पण सानप यांनी उजवा हात धरुन बनसोड यांना चावा घेतला. त्यामुळे रक्तबंबाळ झालेले बनसोड जोरजोरात ओरडू लागले.

माजी सैनिकाने घेतला पोलिसांना चावा
माजी सैनिकाने घेतला पोलिसांना चावा

औरंगाबाद - विना हेल्मेट दुचाकीस्वार माजी सैनिकाला वाहतूक पोलिसांनी दंडाची पावती ठोठावताच त्याने उपनिरीक्षकासह जमादारासोबत वाद घालून त्यांना चावा घेतल्याचा अजब प्रकार बाबा पेट्रोल पंप चौकात घडला. विशेष म्हणजे याच माजी सैनिकाला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीही दंडाची पावती दिली होती. त्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला होता. भगवान कृष्णाजी सानप (वय ५५, रा. जयश्री कॉलनी, मुकुंदवाडी) असे माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांना वेदांतनगर पोलिसांनी अटक केली आहे.

माजी सैनिकाने घेतला पोलिसांना चावा
पोलिसांनी दिली माजी सैनिकाला दंडाची पावती

वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संजय बनसोड, यांच्यासह इतरही पोलीस बाबा पेट्रोल पंप चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी दुपारी पावणेबाराच्या सुमारास क्रांती चौकाकडून दुचाकीवर (एमएच-२०-डीएक्स-५८६८) विना हेल्मेट जात असलेल्या माजी सैनिक सानप यांना सहायक फौजदार करीम यांनी थांबवले. त्यावेळी सानप यांच्याकडे कागदपत्रे व वाहन परवान्याची चौकशी करण्यात आली. कागदपत्रे नसल्याचे सांगून सानप यांनी ‘तुम्ही मलाच का पकडले’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच दुचाकीला लावलेले हेल्मेट हातात घेऊन ते सहायक फौजदार करीम यांच्या अंगावर धाऊन येऊ लागले. त्यामुळे त्यांना समजावून सांगत कागदपत्रे नसल्याने रितसर ई-चालान मशिनव्दारे बाराशे रुपयांच्या दंडाची अनपेड पावती दिली.

माजी सैनिकाने केला हल्ला

यानंतर पोलीस पुन्हा वाहतूक नियमनाच्या कामाला लागले. दुपारी एकच्या सुमारास अचानक सानप पुन्हा त्याच चौकात आले. त्यावेळी सानप यांनी उपनिरीक्षक बनसोड यांना मला बाराशे रुपयांच्या दंडाची पावती का दिली? असे म्हणून वाद घालायला सुरूवात केली. बनसोड यांना शिवीगाळ करुन त्यांनी हातातील ई-चालान मशीन घेत खाली पाडले. यावेळी समजावून सांगत असताना सानप यांनी दुचाकीवरील हेल्मेट काढून बनसोड यांच्या हातावर मारले. त्यांना बनसोड यांनी अडविण्याचा बराच प्रयत्न केला. पण सानप यांनी उजवा हात धरुन बनसोड यांना चावा घेतला. त्यामुळे रक्तबंबाळ झालेले बनसोड जोरजोरात ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकुन जमादार माळी मदतीला धावून गेले. तेव्हा त्यांच्या देखील डाव्या हाताच्या बोटाला सानप यांनी चावा घेतला. त्यामुळे जमलेल्या पोलीस व रिक्षा चालकांनी सानप यांना पकडून ठेवले. त्यानंतर वेदांतनगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. बनसोड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, सानप यांना अटक करण्यात आली आहे.

...म्हणून राग अनावर

हेल्मेट सक्तीची मोहिम शहरात राबवली जात आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी देखील हेल्मेट सक्ती राबविण्यात आली. त्यानंतर ही सक्ती शिथील करण्यात आली. सध्या कोरोना आणि लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक अक्षरश: वैतागून गेले आहेत. पोलिसांना आदेश असल्यामुळे त्यांना देखील कर्तव्य बजावावे लागत आहे. मात्र, सानप यांना दोन दिवसात दुस-यांदा दंडाची पावती देण्यात आली. त्यामुळे ते अक्षरश: वैतागले होते.

हेही वाचा-म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्रात इंजेक्शनचा पुरवठा करा; केंद्राला उच्च न्यायालयाच्या सूचना

Last Updated : May 28, 2021, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.