ETV Bharat / state

औरंगाबादेत 'कटपुतली' खेळाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती - कटपुतली

औरंगाबादेतील मेहरबाबा संस्थेच्या दीपाली बाभूळकर यांच्या कटपुतलींच्या कार्यक्रमाद्वारे चिमुकल्यांना पर्यावरणविषयक आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

चिमुकल्यांना कटपुतलींचा खेळ दाखवितांना दिपाली बाभुळकर
author img

By

Published : Jun 5, 2019, 2:46 PM IST

औरंगाबाद - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजकमल चौक येथे आज (बुधवारी) सकाळी 'कटपुतली' खेळाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली. मेहरबाबा संस्थेच्या दीपाली बाभूळकर यांच्या कटपुतलींच्या कार्यक्रमाद्वारे चिमुकल्यांना स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला.

कटपुतलीच्या खेळाच्या माध्यमातून पर्यावरण जागृती
अवतार मेहरबाबा संस्थेच्या माध्यमातून आलोक सिंग, रुचिर त्यागी हे आयटी क्षेत्रातील दोन युवक रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना रोज सकाळी 6 ते 9 दरम्यान राजकमल चौक येथे शिकवतात. आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दीपाली बाभूळकर यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या चिमुकल्यांसाठी कटपुतलींचा विशेष कार्यक्रम आयोजित केला. रोज अंघोळ करावी, केस विंचरावे, उवा काढाव्यात यासह झाडे लावावीत, जंगली प्राण्यांचे संरक्षण करावे असा संदेश कटपुतलीच्या कार्यक्रमाद्वारे यावेळी देण्यात आला. या उपक्रमात प्रा. साधना गुडधे, सुरेश ढोक, प्रसाद जोशी, अविनाश सोनवणे, दिनेश इंगळे, लता शिंगणे आदी सहभागी झाले होते.

Intro:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजकमल चौक येथे आज सकाळी कातपुतलिंच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेहरबाबा संस्थेच्यावतीने आयोजिय या कार्यक्रमात दीपाली बाभूळकर यांच्या कट पुतल्याच्या कार्यक्रमाद्वारे रस्त्यावर भटकणाऱ्या चिमुकल्यांना स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला

Body:अवतार मेहरबाबा संस्थेच्या माध्यमातुन आलोक सिंग,रुचिर त्यागी हेआयटी क्षेत्रातील दोन युवकरस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना रोज सकाळी 6 ते 9 वाजेदरम्यान राजकमल चौक येथे शिकवतात. आज पर्यावरण दिनाचे औचित्त साधून शिक्षण विभागात कार्यरत दीपाली बाभूळकर यांचा कटपुतलीचा विशेष कार्यक्रम रस्त्यावर फिरणाऱ्या चिमुकळ्यांसाठी आयोजित करण्यात आला. रोज आंगहिव करावी, केस विंचरावे, उवा काढाव्यात यासह झाडं लावावीत, जंगलात शिकार करायची नाही असा संदेश कटपुतलीच्या कार्यक्रमाद्वारे यावेळी देण्यात आला. या उपक्रमात प्रा साधना गुडधे, सुरेश ढोक, प्रसाद जोशी, अविनाश सोनवणे, दिनेश इंगळे,लता शिंगणे आदी सहभागी झालेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.