ETV Bharat / state

परीक्षेच्या तणावातून औरंगाबादेत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या - विद्यार्थी आत्महत्या

मृत अक्षय माने हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत होता. शेवटच्या वर्षात त्याचे सहा विषय राहिले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता. यातूनच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

suicide
मृत अक्षय सोमनाथ माने
author img

By

Published : Dec 19, 2019, 12:57 PM IST

Updated : Dec 19, 2019, 1:16 PM IST

औरंगाबाद - अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात सहा विषय राहिल्याने परीक्षेच्या तणावात असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय सोमनाथ माने(वय 22,रा.ताडसोना, बीड), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मृत अक्षय हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत होता. शेवटच्या वर्षात त्याचे सहा विषय राहिले होते. त्यामुळे तो तणावाखाली होता. पाच ते सहा दिवसांपूर्वी तो शहरातच वास्तव्यास असेलेल्या चुलत भाऊ जयदीप माने यांच्याकडे रहायला आला होता. भाऊ जयदीप बुधवारी सकाळी नोकरीवर गेले असता, अक्षयने खोलीचा दरवाजा आतून बंद करून ठेवला होता. नोकरीवरून रात्री 8 वाजताच्या सुमारास जेव्हा जयदीप घरी आले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने जयदीप यांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडला असता, अक्षयने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा - एकाच सोसायटीमध्ये दोन जणांची आत्महत्या

नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कापसे, एल.व्ही हिंगे, पोलीस नाईक जगदीश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. अक्षयला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केले. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाबुराव पांढरे करत आहेत.

Intro:अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचे सहा विषय राहिल्याने परीक्षेच्या तणावात एका 22 वर्षीय विद्यार्थाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरातील विद्यानगर भागात घडली.
अक्षय सोमनाथ माने वय-22 (रा.ताडसोना, ता.जि. बीड, ह.मु.विध्यानगर, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यर्थाचे नाव आहे.

Body:मृत अक्षय हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियर चे शिक्षण घेत होता.शेवटच्या वर्षाचे त्याचे सहा विषय राहिले होते.त्यामुळे तो पाच ते सहा दिवसांपूर्वीच बीड हुन औरंगाबादेत राहणाऱ्या चुलत भाऊ जयदीप माने कडे राहायला आला होता. भाऊ जयदीप हा बुधवारी सकाळी नोकरीवर गेला होता त्यानंतर अक्षय ने त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून ठेवला होता. नोकरीवरून रात्री 8 वाजेच्या सुमारास जेंव्हा जयदीप घरी आला तेंव्हा दरवाजा आतून बंद होता.अनेक वेळा आवाज देऊन देखील आतून प्रतिसाद मिळत नसल्याने जयदीप ला संशय आला त्याने दरवाजा तोडला असता छताच्या हुकाला शॉलच्या साहाय्याने अक्षयने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.या बाबात नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली असता पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कापसे,एल.व्ही हिंगे, पोलीस नाईक जगदीश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत अक्षयला फसावरून उतरवत घाटी रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती डॉक्टरांनी तपासून अक्षयला मृत घोषित केले.या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस नाईक बाबुराव पांढरे करीत आहेत.Conclusion:
Last Updated : Dec 19, 2019, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.