औरंगाबाद - पायांना साखळदंड बांधलेल्या अवस्थेत एक वृद्ध महिला वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव आढळून आली आहे. या महिलेला अशा अवस्थेत पाहून अनेकजण अवाक झाले आहेत. कारण या महिलेसोबत कोणीही आढळून आले नाही. नागरिकांनी बराच वेळ वाट पाहिली कोणीही सोबत नसल्याचे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
आज सकाळच्या सुमारास ही महिला बेवारस अवस्थेत आढळून आली. या महिलेला काही सांगता येत नसून ही महिला वेडसर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विरगाव पोलिसांनी या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सोमवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव येथील शाळेच्या बाहेर ही महिला नागरिकांना आढळली. या महिलेच्या पायांना साखळदंडाने बांधून त्याला कुलूप लावलेले होते. या महिलेला पाहून शाळेतील विद्यार्थी भयभीत झाले. गावातील नागरिकांना या घटनेची माहिती मिळताच तिच्या सोबत कोणी आहे का? याचा तपास घेतला. महिलेला स्वतः बद्दल काहीही सांगता येत नसल्याने महिलेबाबत किंवा तिचे पाय का बांधले? याबाबत काहीही कळू शकले नाही, बराच वेळ कोणीही सोबत नसल्याचे लक्षात आले असता गावकऱ्यांनी गिरगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.