औरंगाबाद - मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाड्यातील सर्व धरणं एकमेकांना जोडण्याच नियोजन केले जात असून अकरा धरणं एकमेकांना जोडली जाणार आहेत. इतकच नाही तर वॉटर ग्रीडच्या माध्यमातून सर्वांना पाणी दिल जाणार आहे. प्रत्येकाला हक्काचं पाणी मिळाल पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे अश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील लासुर येथील बजाज चारा छावणीला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे देखील उपस्थित होते.
दुष्काळात मराठवाडा सर्वात जास्त होरपळला आहे, पाऊस कमी झाल्याने पीक कमी आली आहेत. आधीच्या सरकारच्या काळात मार्च पर्यंत दुष्काळ जाहीर व्हायचा, मात्र आम्ही ऑक्टोबरमध्येच आम्ही दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न केलाय. या आधी केंद्रातून दुष्काळी मदत ७०० कोटींचा सुमारास येत होती. मात्र यावेळी ४७०० कोटी केंद्राने मदत निधी दिला. ७०० कोटींची मदत औरंगाबाद जिल्ह्यात आम्ही केली.
असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार सारख्या यशस्वी योजना राबवल्याने अनेक ठिकाणी विहिरींना पाणी राहीले, त्यामुळे थोडा दिलासा मिळालाय. जलयुक्त शिवारमुळे शेतीमालाचे नुकसान कमी झालं. यावर्षी पावसाळा थोडा उशिरा येणार असल्याने पेरणीची घाई करू नका अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर मराठवाड्याला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळावा, चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा करतो. कापूस आणि सोयाबीनला चांगले भाव मिळाले ते आणखी चांगले होतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली.