ETV Bharat / state

Dil Se Desi जगप्रसिद्ध अजिंठा वेरुळ लेणीला पर्यटकांची विशेष पसंती

author img

By

Published : Aug 12, 2022, 6:11 PM IST

यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्षे पुर्ण होत आहेत. यानिमित्त्य सर्वत्र अमृत महोत्सव साजरा केला जातोय. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्य ईटिव्ही भारत जागतीक व ऐतिहासिक स्थळांची माहीती आपल्यासाठी घेऊन येत आहे. याअंतर्गत आज आपण बघणार आहोत औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध अजिंठा वेरुळ लेणी. तसेच औरंगाबाद शहरातील इतर पर्यटन स्थळे.

Dil Se Desi
जगप्रसिद्ध अजिंठा वेरुळ लेणी

औरंगाबाद (Aurangabad) पर्यटन नगरी असलेल्या जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा मोठा आहे. वेरूळ अजिंठा सारख्या जागतीक दर्जाच्या पर्यटन (The world famous Ajanta Ellora Caves) स्थळांसोबत बिबिका मकबरा आणि देवगिरी किल्ला विशेष आकर्षण ठरते. दरवर्षी लाखो पर्यटक शहरात पर्यटनासाठी दाखल (special favorite of tourists) होतात. त्यावर कोट्यावधींची उलाढाल होत असते.

अजिंठा लेणी उतरते पसंतीस जगप्रसिद्ध अजिंठा लेणी वाकाटक, गुप्त आणि सातवाहन कालखंडातील आहे. इसवी सन दुसरे शतक ते सातवे शतक या काळात लेण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरात तीस लेणी असून पूर्ण लेण्या बुद्ध लेण्या आहेत. लेणी क्रमांक 1, 2, 16 आणि 17 मध्ये बुद्धाच्या जीवनातील जातक कथा चित्रित करण्यात आल्या आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य जर पाहिले, तर बुद्धांच्या जन्माच्या आधीपासूनच्या कथा यात रेखाटण्यात आणि चित्रित करण्यात आल्या आहेत. बौद्ध धर्माच्या आधारावर या सर्व कलाकृती आहेत. बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणा पर्यंतचा प्रवास या लेण्यांमध्ये अनुभवायला मिळतो. अतिशय कोरीव आणि रेखीव अशा कलाकृती या लेण्यांमध्ये साकारण्यात आल्या आहेत, अशी माहिती इतिहास तज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी दिली.

वेरूळ लेणीचे वैशिष्ट्य ठरते आकर्षक वेरूळ परिसरात एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये लेणी क्र. 1 ते 12 या बौद्ध संस्कृती, लेणी क्र. 12 ते 30 हिंदू संस्कृती लेणी, तर लेणी क्र. 31 ते 34 या जैन संस्कृतीचे दर्शन घडवतात. जगामध्ये या तीन्ही संस्कृतीचे एकत्र दर्शन घडवणारी वेरूळ लेणी ही एकमेव आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये डेसॉल्ट दगडात या सर्व कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. द्रविडीयन पद्धतीत साकारण्यात आलेल्या लेण्यांची निर्मिती इ.स 600 ते 1000 या काळात निर्माण झाल्याचे सांगितले जाते. व्यापारी मार्गावर असल्याने या लेण्या पहिल्यापासूनच प्रसिद्धी झोतात होत्या. धर्म वाढवण्यासाठी लेण्यांच्या माध्यमातून त्याकाळी प्रचार केला जात होता. त्यातूनच या लेण्यांची निर्मिती झाल्याचे इतिहासतज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी सांगितले.

मिनी ताजमहाल पाहण्यासाठी होते गर्दी आग्रा येथील ताज महालाची हुबेहूब प्रतिमा म्हणजे औरंगाबादच्या, बेगमपुरा भागात असलेला बिबीचा मकबरा. मोगल शैलीचे उत्तम उदाहरणं म्हणून याकडे पाहिले जायचे. औरंगजेब यांचा मुलगा आजम शहा याने आपली आई रझिया उल दुराणीच्या आठवणीत हा महाल तयार केल्याचे इतिहासात नमूद आहे. तर औरंगजेब दिल्लीला गेला असताना; त्याने शहाजहाँने बांधलेला ताजमहाल पाहिला होता. असा एखादा महाल आपणही बांधवा, अशी इच्छा त्याची होती. त्यानुसार त्याने हा मकबरा बांधला, असे मत काही इतिहास तज्ञांचे आहे. ताज महाल पूर्णतः संगमरवर दगडात बांधलेला आहे. मात्र, बिबीचा मकबरा बेसॉल्ट दगड, संगमरवर दगड, चुना यांचा वापर करून बांधण्यात आला. यामध्ये कारंजे, बगीचे आहेत. औरंगजेब कलेचा पुजारी नव्हता. तरी, त्याने उभारलेली ही वस्तू केलेचे उत्तम दर्शन घडवणारी आहे, असे मत इतिहासतज्ञ संजय पाईकवार यांनी व्यक्त केले.

शहरातील गेट आहे भूषण औरंगाबाद शहरात ५२ दरवाजे मलिकंबर औरंगजेबाच्या काळात तयार करण्यात आले. हे दरवाजे एकेकाळी शहराची तटबंदी होत्या. भले मोठे असणारे दरवाजे काही शतक मुख्य आकर्षणाचा भाग होते. आता यातील बरीच दरवाजे मोडकळीस आली आहेत. तर काही दरवाजे नामशेष झाले आहेत. महानगर पालिकेने काही दरवाजांची दुरुस्ती केली आहे. मुख्य रस्त्यावरून जाताना हे दरवाजे देखील विशेष आकर्षण ठरतात.

हेही वाचा Dil Se Desi भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेली महत्तवपूर्ण संग्रहालये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.