ETV Bharat / state

'मागे झालेलं लक्षात ठेवण्यासारखं नाही, यापुढे योग्य वेळी शपथ घेईल'

यापुढे पहाटे नाही. तर योग्य वेळेवर शपथ घेऊ, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच त्या दोन दिवसांचा किस्सा लवकरच पुस्तकातून तुमच्यापर्यंत पोहचवू, असेही ते म्हणाले.

फडणवीस
फडणवीस
author img

By

Published : Nov 23, 2020, 6:39 PM IST

औरंगाबाद - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या सोबत पहाटे घेतलेल्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यावर अशा घटना लक्षात ठेवायच्या नसतात. यापुढे पहाटे नाही. तर योग्य वेळेवर शपथ घेऊ, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच सरकार बेईमान आहे. ज्यादिवशी सरकार पडेल, त्या दिवशी दुसरं सरकार राज्याला देऊ. त्या दोन दिवसांचा किस्सा लवकरच पुस्तकातून तुमच्यापर्यंत पोहचवू, असेही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

वीज सवलतीबाबत तीन मंत्र्यांनी घोषणा केली. लोकं वीजबिल भरायला तयार आहेत. मात्र वापरलेल्या विजबिलाचे पैसे ते भरायला तयार आहेत. न वापरलेल्या विजेचे बिल ते का भरतील? त्यामुळे सवलत मिळेल असे वाटत असताना, विजेचे बिल भरावे लागेल, असे सांगितले जात आहे. आता म्हणतात की, आमचा अभ्यास नाही. मुळात सरकारमधील लोकांमध्ये समन्वय नाही. ज्याला जे वाटेल तो ते बोलतोय, यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला, असे फडणवीस म्हणाले.

कराची लवकरच भारतात येईल, असा विश्वास...

संजय राऊत यांनी मुंबईतील कराची बेकरीबाबत केलेल्या विधानावर फडणवीस यांनी टीका केली. राऊत यांनी त्यांच्याच लोकांना सांगावं, नावाबाबत आमच काही म्हणणं नाही. कारण, आम्ही अखंड भारत करण्यात विश्वास ठेवतो. कराची पुन्हा भारताचा भाग होईल. याबाबत आम्हाला विश्वास आहे, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले.

सरकारवर लोक नाराज -

मराठवाड्यावर राज्य सरकार अन्याय करत आहे. या सरकारवर लोक नाराज आहे, आमच्या अजेंड्यावर मराठवाड्यातील हा भाग होता, अनेक नव्या प्रकल्पांचे नियोजन करण्याचे आम्ही प्रयत्न केले. मात्र, या सरकारने त्यातील काही प्रकल्प स्थगित केले, लोकांचा रोष ओढवला जाईल, म्हणून प्रकल्प कोमात टाकले. गडकरी साहेबांच्या माध्यमातून केलेले प्रकल्प थांबवण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये हे सरकार काम करत नाही, ही धारणा झाल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आमचा विजय होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

...तर माध्यमे पंकजा नाराज ही बातमी दाखवतात -

मागच्यावेळी 64 हजार मत घेऊनही पराभव झाला, यावेळी मात्र तयारी केली आहे. वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. सध्याच्या आमदाराबाबत नाराजी आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यावर फडणवीसांनी केली. बातम्या नसल्या तर, पंकजा मुंडे नराजीच्या बातम्या दाखवल्या जातात, असेही ते म्हणाले.

पोटात एक आणि ओठात एक असं नाही -

आजकाल काही गोष्टी करायची भीती वाटते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. सभेत असताना घड्याळ खराब होते म्हणून एका कार्यकर्त्याला वेळ विचारली, तर लगेच चर्चा सुरू होतात, ताई वेगळ्याच वाटेवर, चहा पिताना कप हातात घेतला तर, लगेच त्याचा फोटो काढून कपाला पाठिंबा अशा चर्चा रंगतात. मी गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. पोटात एक आणि ओठात एक असं नाही, असे पंकजा म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.