ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटून घेणार शपथ?

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला जनादेश दिला असला तरी सत्ता स्थापन करण्यावरून सेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या मदतीशिवाय ७ नोव्हेंबरला सरकार स्थापन करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 6, 2019, 3:34 PM IST

Updated : Nov 6, 2019, 5:05 PM IST

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला जनादेश दिला असला तरी सत्ता स्थापन करण्यावरून सेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या मदतीशिवाय ७ नोव्हेंबरला सरकार स्थापन करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. ७ किंवा ८ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस सकाळी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पूर्ण करतील आणि आपले सरकार स्थापन करतील, अशी माहिती समोर येत आहे.

संजय वरकड यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले राज्यातील अस्थिर परिस्थितीबाबत पवारही चिंतातूर

बहुमत सिद्ध करण्यासाठी पंधरा दिवसांचा कलावधी देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडून मागून घेतील, असे देखील सूत्रांनी सांगितले आहे. राजकीय अभ्यासकही या परिस्थितीवर सकारात्मक असल्याचे दिसत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप दोन्ही मित्र पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळेस भाजपला स्पष्ट बहुमत नव्हते. त्यांनी शिवसेनेची वाट पाहिली, शिवसेनेची नकारात्मक भूमिका होती. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले. शिवसेना काही दिवस विरोधात बसली. मात्र, त्यानंतर शिवसेनेने सत्तेत सहभागी होत भाजपला साथ दिली. त्याच धर्तीवर आता भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल आणि शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची लागलेली आस मोडीत काढेल, अशी रणनीती भाजपकडून आखली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याने जनादेश मिळूनही युतीने अद्याप सरकार स्थापन केलेले नाही. मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी शिवसेना अडून बसली आहे. तर दुसरीकडे भाजप काही अपक्षांना आपल्या सोबत जोडून आपले संख्याबळ वाढून दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच ९ नोव्हेंबरला जुन्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्याआधी नवे सरकार अस्तित्वात येणे गरजेचे आहे.

शिवसेनेशिवाय ७ किंवा ८ तारखेला देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा प्रस्ताव देणार आहेत. इतकेच नाही तर त्याच ठिकाणी ते मुख्‍यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करून नव्या सरकारची स्थापना करतील, अशी माहिती मिळत आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी ते राज्यपालांकडे मागून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेल्या कालवाधीत शिवसेनेसोबत वाटाघाटी करून पुन्हा सोबत घेऊन काही मंत्रिपद दिली जाऊ शकतील, अशी सुत्रांकडून माहिती मिळत आहे.

एकीकडे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांना घेऊन वेगळा पर्याय निर्माण करत सरकार स्थापन करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर भाजप धक्कातंत्र वापरून नवे सरकार निर्माण करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निश्चितच पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय उलाढाली दिसून येतील, अशी शक्यता आहे. या वृत्ताला अभ्यासकांनी देखील दुजोरा दिला आहे. याशिवाय दुसरा पर्याय भाजप पुढे नसल्याचे मत राजकीय अभ्यासक आणि सकाळचे संपादक संजय वरकड यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - काँग्रेस नेते अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राज्यात मोठ्या घडामोडीची शक्यता

Intro:राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला जनादेश दिला असलं तरी मात्र सत्ता स्थापन करण्यावरून सेना-भाजप आत सुरू असलेला वाद हा सत्ता स्थापनेमध्ये अडचण निर्माण करतोय. भाजप-शिवसेनेच्या मदतीशिवाय सात नोव्हेंबरला सरकार स्थापन करेल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सात किंवा आठ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस सकाळी राज्यपालांची भेट घेऊन. मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पूर्ण करतील आणि आपलं सरकार स्थापन करतील अशी माहिती समोर येत आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडून मागून घेतील असे देखील सूत्रांनी सांगितल. या वृत्ताला अभ्यासकांनी देखील दुजोरा दिलाय.
Body:2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप दोन्ही मित्र पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळेस स्पष्ट बहुमत भाजपला मिळाला नव्हतं शिवसेनेची वाट त्यांनी पाहिली मात्र वेळीच त्यांची युती झाली नाही तरी भाजपने सरकार स्थापन केल. शिवसेना काही दिवस विरोधात बसली मात्र त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभाग घेत भाजपाला साथ दिली. त्याच धर्तीवर आता भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची लागलेली आस मोडीत काढेल अशी रणनीती भाजपकडून आखली जात असल्याची माहिती समोर येत आहे.Conclusion:मुख्यमंत्रीपदावरून वाद असल्याने जनादेश मिळूनही युतीने अद्याप सरकार स्थापन केलेल नाही. मुख्यमंत्रीपद मिळावं यामुळे शिवसेना अडून बसलयाच दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाजप काही अपक्षांना आपल्या सोबत जोडून आपले संख्याबळ वाढून दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आठ नोव्हेंबरला जुन्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्याआधी नवे सरकार अस्तित्वात येणे गरजेचे आहे. शिवसेना कुठेतरी भाजपाला अडवून बघत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शिवसेनेला बाजूला करून सात किंवा आठ तारखेला देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा प्रस्ताव देणार आहेत. इतकंच नाही तर त्याच ठिकाणी ते मुख्‍यमंत्रीपदाची शपथ ग्रहण करून नव्या सरकारची स्थापना करतील आणि लागणार बहुमत सिद्ध करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी ते राज्यपालांकडे मागून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या एका महिन्यात शिवसेनेसोबत वाटाघाटी करून पुन्हा त्यांना सोबत घेऊन काही मंत्रीपद त्यांना दिली देऊ शकतात अशी रणनीती भाजपकडून आखली गेल्याचे सूत्रांनी सांगितल आहे. त्यामुळे या सर्व वादात भाजप पुढे जाऊन सरकार स्थापन करणार असल्याचं दिसून येतंय. एकीकडे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांना घेऊन वेगळा पर्याय निर्माण करत सरकार स्थापन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर भाजप धक्कातंत्र वापरून नवं सरकार निर्माण करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निश्चितच पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय उलाढाली दिसून येतील अशी शक्यता आहे. या वृत्ताला अभ्यासकांनी देखील दुजोरा दिला आहे. याशिवाय दुसरा पर्याय भाजप पुढे नसल्याचं मत राजकीय अभ्यासक आणि सकाळचे संपादक संजय वरकड यांनी व्यक्त केलं आहे.
Byte - संजय वरकड - राजकीय अभ्यासक
Last Updated : Nov 6, 2019, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.