ETV Bharat / state

महिलांविषयी सोशल मीडियावर अपशब्द, नाभिक समाजाची गुन्हा नोंद करण्याची मागणी - महिलांविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्यावर गुन्हे दाखल बातमी

लॉकडाऊननंतर राज्यातील बहुतांशी व्यावसायांना सरकारने सुरू करण्याची परवानगी दिली. पण हातावर पोट असलेल्या सलून मालक आणि कारागीर यांच्या दुकानांना परवानगी न दिल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली असल्याने समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येत विविध स्वरूपात आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथे मूक धरणे आंदोलन केले.

nabhik community
महिलांविषयी सोशल मीडियावर अपशब्द, नाभिक समाजाची गुन्हा नोंद करण्याची मागणी
author img

By

Published : Jun 9, 2020, 8:15 PM IST

औरंगाबाद (सिल्लोड) - लॉकडाऊन काळात बंद असलेल्या सलून दुकानांना चालू करणे, विमा संरक्षण, दरमहा 10 हजारांची मदत, वीजबिल आणि दुकान भाडे माफ करणे, तसेच सोशल मीडियावर महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद व्हावा, आदी मागण्यांसाठी आज औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील नाभिक समाज बांधव आणि महिलांनी दोन ठिकाणी बसून मूक आंदोलने केली.

लॉकडाऊननंतर राज्यातील बहुतांशी व्यावसायांना सरकारने सुरू करण्याची परवानगी दिली. पण हातावर पोट असलेल्या सलून मालक आणि कारागीर यांच्या दुकानांना परवानगी न दिल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली असल्याने समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येत विविध स्वरूपाच्या आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथे मूक धरणे आंदोलन केले. या आंदोलन प्रसंगी सलून साहित्य, मागण्यांची पोस्टर घेऊन तसेच काळ्या फिती बांधून आणि सुरक्षित अंतर ठेवून नाभिक बांधव सिल्लोड तहसीलसमोर बसले होते. तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन स्वीकारले.

नाभिक समाजाच्या महिलांचे आंदोलन आणि आक्षेपार्ह पोस्ट

बुलडाणा जिल्ह्यातील विवेक लांबे याने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये नाभिक समाजाच्या महिलांच्या बाबतीत अत्यंत लज्जास्पद कॉमेंट केले आहे. त्याच्यावर विनयभंगासह इतर गुन्हे दाखल करून अटक करावी, या मागण्यांसाठी तालुक्यातील नाभिक समाजाच्या महिला सिल्लोड शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देऊन बसल्या होत्या. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी अर्ज स्वीकारला. पुढील कारवाई सायबर क्राईम विभागाकडे तपासासाठी पाठवून देऊ आणि त्यानंतर आलेल्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. या दोन्ही आंदोलनासाठी नाभिक समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सलून बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.