औरंगाबाद - महिनाभरापासून हर्सूल कारागृहात बंदिस्त असलेल्या ४७ वर्षीय कैद्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सचिन रमेश पाटील असे कैद्याचे नाव असून तो एमपीडीएमधील आरोपी होता. तो महिनाभरापासून हर्सूल कारागृहात होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक बिघडली. कारागृहातील डॉक्टरांनी त्याच्यावर औषधोपचार केले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे सचिनला कोणतीच समस्या नव्हती. अचानक त्याची प्रकृती खालावली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नितीन कामे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, हर्सूल कारागृहातील दवाखाना हलविण्यात आल्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरसह उपचार करण्यास अडचणी येत असल्याचे समजते.