ETV Bharat / state

चितेवर पोहोचलेल्या आजी झाल्या जिवंत; कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील प्रकार

जिजाबाई गोरे असे या महिलेचे नाव आहे. कन्नड शहरातील माजी नगरसेवक विलास गोरे यांच्या त्या आई आहेत. काल (सोमवारी) दुपारच्या सुमारास जिजाबाई यांचे निधन वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले.

jijabai gore
जिजाबाई गोरे
author img

By

Published : Aug 3, 2021, 9:44 AM IST

कन्नड (औरंगाबाद)- तालुक्यातील अंधानेर येथे 80 वर्षीय महिलाचे दुपारी तीन वाजेच्या सुमारास निधन झाले होते. परिसरातील नागरिक, नातेवाईक जमा झाले. वाजत गाजत अंत्ययात्रा निघाली. सर्व विधी आटोपून चितेला अग्नी देणार तोच मृत महिलेच्या पापण्या हलू लागल्या. नंतर हात हलले आणि झालेला प्रकार बघून उपस्थितांसह शोकाकुल नातेवाईकांना आश्चर्याचा धक्का बसला.

अग्नी देणार तितक्यात...

ही घटना कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील आहे. जिजाबाई गोरे असे या महिलेचे नाव आहे. कन्नड शहरातील माजी नगरसेवक विलास गोरे यांच्या त्या आई आहेत. काल (सोमवारी) दुपारच्या सुमारास जिजाबाई यांचे निधन वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती फोन वरून व सोशल मीडियावरून नातेवाईक, मित्र व गावकऱ्यांना देण्यात आली. अंत्यविधीची तयारी करून वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंधानेर येथील स्मशानभूमीत रचलेल्या सरणावर देह ठेवला. गौऱ्या रचल्या आणि शेवटी पाणी पाजून अग्नी देणार तितक्यात जिजाबाई यांच्या पापण्या हालल्याचे काहींच्या लक्षात आले. यानंतर त्यांचे हात हालले. यावेळी उपस्थितांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

हेही वाचा - नागपूर सामूहिक बलात्कार प्रकरण : 'त्या' पीडितेवर यापूर्वीही झाला होता बलात्कार

यानंतर नातेवाईकांनी त्यांना रात्री साडेनऊच्या सुमारास कन्नड येथील डॉ. मनोज राठोड यांच्याकडे दाखल केले. त्या जिवंत असून त्यांचे हृदय सुरू होते. मात्र, त्या ब्रेन डेड असून कोमात गेल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. तसेच डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.