सिल्लोड (औरंगाबाद) - तालुक्यातील उपली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघ दावाडी येथे मंगळवारी वळण रस्त्यावर तुषार महेर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह घरी नेण्यासाठी चक्क खाटेचा वापर करावा लागलेला आहे.
वाघ दावाडीला जाण्यासाठी रस्ता नाही -
उपली ते वाघ दावाडी या रस्त्याच्या परिसरातील शेतकऱ्यांचा रस्त्यावरून वाद सुरू आहे. ते प्रकरण हे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे. मात्र, त्याचा परिणाम हा येथील जनसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. जनसामान्यांना गावात जाण्यासाठी रस्ता नाही आहे. मंगळवारी या परिसरात आपघातमध्ये तुषार महेर याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह घरी नेण्यासाठी कुटुंबीयांना चक्क खाटेचा आधार घ्यावा लागला. कुटुंबीयांना शेतातून रस्ता काढत मृतदेह घरी नेला आहे.
रस्ता नसल्याने यापूर्वीही तीन मृत्यू -
यापूर्वीही तुषार महेर या मुलाच्या कुटुंबातील तीन सदस्याचा रस्ता नसल्याने मृत्यू झालेला आहे. यातील एकाला सर्प दंशनंतर वेळेवर रुग्णालयात नेता आले नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. तर त्यापूर्वी याच कुटुंबातील दोघांनी विष प्राशन केले होते, त्या वेळी देखील रुग्णालयात पोहोचविता न आल्याने त्याचाही मृत्यू झाला होता.
हेही वाचा - जुन्नरमधील भर कार्यक्रमातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार निघून गेले; पाहा VIDEO