ETV Bharat / state

Women's Day 2022 : मुलगाच आसावा का? वायंडिंगच्या कामात मुलगी झाली वडिलांचा आधार; वाचा खास स्टोरी - औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील मुलीची स्टोरी

आपण शिक्षण घेतो. मात्र, त्यासाठी पैसे लागतात. प्रत्येकवर्षी खर्च येतो. त्यातच आपल्या लग्नाचेही बापालाही ओझ असते. ते रोज राबराब-राबतात. (Happy Women's Day) त्यांना मदत करायला कोणी मुलगा नाही. पण काय गरज आहे मुलगाच असण्याची. आपणही त्यांना मदत करू शकतो. (International Women's Day) या भावनेतून पल्लवीने आपल्या वडिलांना वायंडिंगच्या कामात मदत करण्याचा निर्णय घेतला. पहा ईटीव्ही भारतचा आंतरराष्ट्रीय दिनानिमीत्त खास रिपोर्ट

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील पल्लवी गिरी वायंडिगचे काम करताना

author img

By

Published : Mar 8, 2022, 8:02 AM IST

Updated : Mar 8, 2022, 9:29 AM IST

औरंगाबाद - मोटर वायंडिंग करणे म्हणजे तस तांत्रिक आणि मेहनीच काम. (International Women's Day 2022) हे काम येण्यासाठी सरावासोबत अनुभव देखील लागतो. मात्र, हेच काम एका चिमुकलीच्या कुटुंबाचा गाडा हाकण्याचे आणि शिक्षणासाठी मदत देणारा होत आहे. ती अवघ्या 14 वर्षाची आहे. तिचे हात कधी पेन धरतात, तस वायंडिंगची तार धरतात, तर कधी हाताने भाकरी देखील थापतात. (Women's Day significance) वडिलांना कामात मदत करून आर्थिक भार उचलत आहे. ही गोष्ट आहे पाचोड येथील खादगाव येथील पल्लवी गिरी या मुलीची.

घरची परिस्थिती बेताची असल्याने वायंडिंगचे काम
आंतरराष्ट्रीय दिनानिमीत्त खास स्टोरी

मुली मुलांपेक्षा कमी नाही अस आपण नेहमी म्हणतो. त्याचा प्रत्यय अनेक वेळा येतो देखील. असाचं प्रत्यय पाचोड तालुक्यातील नागरिकांना येतोय. पाचोडपासून जवळ असलेल्या (खादगाव ता. पैठण)येथील रामनाथ गिरी यांना तीन मुली आहेत. शेतीत सतत होणारे नुकसान चिंतेचा विषय झालाच आहे. (Women's Day theme) मात्र, त्यामुळे आर्थिक घडी बसवणे देखील अवघड जात आहे. दिवसभर पाचोड येथे वायंडिंगच्या दुकानात काम करायचं आणि घरी आल्यावर गावातील नागरिकांच्या मोटर वायंडिंगचा व्यवसाय ते करतात. आपला बाप एकटा राबराब-राबत असल्यामुळे त्यांची धाकटी मुलगी पल्लवी ही शिक्षाणाबरोबरच वडिलांच्या कामातही हातभार लावत आहे.

शिक्षण घेत वडिलांना मदत

रामनाथ गिरी हे गावातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटार भरतात व त्यातून येणाऱ्या पैशात आपला कुटुंबाचा गाडा हाकतात. त्यांची धाकटी मुलगी पल्लवी ही पांरूडी येथील महाविद्यालयामध्ये नववीत शिक्षण घेत आहे. एकट्या कुटुंबाचा गाडा ओढताना बापाची होणारी दमछाक पल्लवीने जवळून अनुभवली. बापाचे हात अधिक बळकट करण्यासाठी लेकीने पुढाकार घेत वडीलांच्या हाताला कष्टाचे बळ देण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. वडील वायंडिंगचे काम करताना तीने देखील कला आत्मसात केली.

पल्लवीही सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत शाळेत जाते

अवघ्या 14 वर्षाची नववीच्या वर्गात शिकणारी पल्लवी शेतकऱ्यांच्या शेतातील बोरवेल, विहीर यामधील नादुरूस्ती विद्युत मोटार भरण्यासाठी धडपड करत आहे. पल्लवीही सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत शाळेत जाते आणि पाचनंतर वडिलांना मदतीचा हातभार लावण्याचे काम ती करते. त्याच बरोबर आईला स्वयंपाकात देखील मदत करते.

खूप शिक्षण घ्यायचं

घराची परिस्थिती बेताची असल्याने काम करणे गरजेचे आहे. आज त्रास होत असला तरी काम करत शिक्षण पूर्ण करण्याचा मानस आहे. दिवस बदलातील मला खूप शिकून मोठ व्हायचे असा विश्वास पल्लवीने व्यक्त केला. तर पल्लवी माझ्यासोबत मोटार दुरूस्ती करण्याच्या कामात मदत करते. एका मुलाप्रमाणे माझ्यासोबत शेतात पाणी धरते. आम्हाला मुलगा नाही. परंतु, पल्लवी हीच आमचा मुलगा आहे. असा विश्वास पल्लवीचे वडील रामनाथ गिरी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - International Women Day 2022 : सोलापूरमध्ये महिलेचा रिक्षा जोरात; पहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

Last Updated : Mar 8, 2022, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.